PMC Elections 2026: 'त्या' उमेदवारांचे चिन्ह अजित पवार काढून घेणार का? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:36 IST2026-01-14T19:35:50+5:302026-01-14T19:36:19+5:30
अजित पवार त्या उमेदवारांचे घड्याळ चिन्ह काढून घेणार का, ते आमचे उमेदवार नाहीत, असे म्हणणार का? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना केला आहे.

PMC Elections 2026: 'त्या' उमेदवारांचे चिन्ह अजित पवार काढून घेणार का? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सवाल
पुणे : सचिन खरात यांच्या रिपाईचे उमेदवार म्हणून ज्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे करत होते, त्यासंदर्भात खरात यांनी स्पष्टीकरण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे. मग आता अजित पवार त्या उमेदवारांचे घड्याळ चिन्ह काढून घेणार का, ते आमचे उमेदवार नाहीत, असे म्हणणार का? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना केला आहे.
महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता थंडावल्या. तत्पूर्वी मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रचाराची माहिती दिली. राष्ट्रवादीने गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यावरून अजित पवार आणि मोहोळ यांच्यात प्रचारामध्ये जुंपली होती.
अजित पवार म्हणत होते, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार हे सचिन खरात यांच्या रिपाईचे आहेत. मात्र खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आपले उमेदवार नाहीत असा खुलासा केला आणि निवडणुकीतून माघार घेतली. मग त्या चार-पाच उमेदवारांकडून त्यांचे चिन्ह काढून घेणार का, ते आमचे उमेदवार नाहीत हे जाहीर करणार का, असा प्रश्न मोहोळ यांनी विचारला.