PMC Elections 2026: गुंड नीलेश घायवळ पासपोर्टबाबत माझ्याशी बोला;रोहित पवारांचे मोहोळ यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:32 IST2026-01-10T10:31:13+5:302026-01-10T10:32:42+5:30

भाजपने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांची अक्षरशः वाताहत केली : रोहित पवार

PMC Elections 2026 Goon Nilesh Ghaywal, talk to me about his passport: Rohit Pawar's challenge | PMC Elections 2026: गुंड नीलेश घायवळ पासपोर्टबाबत माझ्याशी बोला;रोहित पवारांचे मोहोळ यांना आव्हान

PMC Elections 2026: गुंड नीलेश घायवळ पासपोर्टबाबत माझ्याशी बोला;रोहित पवारांचे मोहोळ यांना आव्हान

पुणे : भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांची अक्षरशः वाताहत केली आहे. शहराचा ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी विकास करायला पाहिजे होता, तसा केला नाही. ‘महापालिका निवडणुकीत भाजप निवडून आला नाही, तर खापर आपल्यावरच फुटेल म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत. गुंड नीलेश घायवळ याला पासपोर्ट देण्याच्या विषयावरून मोहोळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज करत आहेत. अजित पवार यांना कशाला चॅलेंज करता, गुंडाच्या पासपोर्टविषयी मीच तुमच्याशी बोलायला तयार आहे,’ असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे निवडणूक प्रभारी व आमदार रोहित पवार यांनी मोहोळ यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा पवार यांच्याकडून वारजे येथे प्रचार करण्यात आला. त्यावेळी रोहित पवार बोलत होते. ते म्हणाले, जैन बोर्डिंग प्रकरणावरून पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना धारेवर धरले.

‘मोहोळ यांचा दिल्लीमध्ये चांगला संपर्क वाढला आहे. त्यांच्या या संपर्कवाढीतूनच त्यांचा नेमका कोणी गेम केला, हेसुद्धा आम्ही सांगू शकतो. शहरात कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी अगोदर त्यांची परवानगी घ्यावी लागते. याबाबतच अजित पवार हे आपली भूमिका मांडत होते. भाजपकडून शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्प, विविध प्रकारच्या व्यवसायांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. फोन करून अडचण करू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात आपण बांगड्या भरल्या नाहीत, असे म्हटले आहे. त्यांच्या या बोलण्यातून महिलांचा उघडणे अपमान केला जात आहे. लांडगे यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर येऊ लागला आहे. त्यामुळेच लांडगे आता घाबरले आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Web Title : रोहित पवार की मोहोल को चुनौती, नीलेश घायवाल के पासपोर्ट पर चर्चा करें।

Web Summary : रोहित पवार ने भाजपा पर पुणे के पतन का आरोप लगाया और एक गैंगस्टर के पासपोर्ट पर मुरलीधर मोहोल को चुनौती दी। उन्होंने परियोजनाओं में बाधा डालने का आरोप लगाया और महेश लांडगे की महिलाओं के खिलाफ टिप्पणियों की आलोचना की, जिससे बढ़ती सार्वजनिक जागरूकता पर प्रकाश डाला।

Web Title : Rohit Pawar challenges Mohol to discuss Nilesh Ghaywal's passport issue.

Web Summary : Rohit Pawar accuses BJP of Pune's decline, challenging Murliधर Mohol over a gangster's passport. He alleges obstruction of projects and criticizes Mahesh Landge's remarks against women, highlighting rising public awareness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.