PMC Elections 2026: पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:24 IST2026-01-21T15:23:58+5:302026-01-21T15:24:43+5:30

PMC Elections 2026 पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारासाठी २ हजार ५०० रूपये तर सर्वसाधारण जागेवरील उमेदवारांसाठी ५ हजार रूपये अनामत रक्कम होती

PMC Elections 2026 Deposits of as many as 796 candidates in Pune confiscated; Shinde Sena has the highest number of 104, while BJP has only 4 candidates | PMC Elections 2026: पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार

PMC Elections 2026: पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ७९६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यात २७१ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. राजकीय पक्षामध्ये शिंदेसेनेच्या उमेदवारांची सर्वाधिक म्हणजे १०४ संख्या आहे. भाजपच्या ४ उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त झाली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारासाठी २ हजार ५०० रूपये तर सर्वसाधारण जागेवरील उमेदवारांसाठी ५ हजार रूपये अनामत रक्कम होती. भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर कॉग्रेस व उद्धवसेना - मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविली आहे. १ हजार १५५ उमेदवारापैकी ७९६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यात सर्वाधिक संख्या शिंदेसेनेच्या उमेदवारांची आहे.

अनामत गमावलेल्या उमेदवाराची पक्षनिहाय संख्या

शिंदेसेना १०४

आप ८१
काँग्रेस ५८

वंचित ५८
उद्धवसेना ५३

मनसे ३८
बसपा ३५

राष्ट्रवादी काँग्रेस २३
राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) २०

एमआयएम ८
अभाहिम ६

रासप ६
संब्रिपा ५

सपा ५
भाजप ४

जसपा २
प्रहार २

बहुजन मुक्ती पार्टी २
रिपाइ (ए)२

लोसंप २
अभासे १

पीआरपी १
बभापा १

बरिसोपा १
भिमसेना १

रासापा १
रिपाइ (खो) १

रिसे १
शेकाप १

सछशा १
हिभासे १

अपक्ष २७१
एकूण ७९६

Web Title : पीएमसी चुनाव 2026: 796 उम्मीदवारों की जमानत जब्त; शिंदे सेना आगे

Web Summary : पुणे पीएमसी चुनाव में 796 उम्मीदवारों, जिनमें शिंदे सेना के 104 शामिल हैं, की जमानत जब्त हो गई। केवल 4 भाजपा उम्मीदवारों को ही ऐसा सामना करना पड़ा, जबकि 271 निर्दलीय उम्मीदवारों ने भी अपनी जमानत राशि जब्त कर ली।

Web Title : PMC Elections 2026: 796 Candidates Lose Deposits; Shinde Sena Leads

Web Summary : Pune's PMC election saw 796 candidates, including 104 from Shinde Sena, lose their deposits. Only 4 BJP candidates faced the same fate, while 271 independent candidates also forfeited their deposit.