PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:46 IST2026-01-16T12:45:16+5:302026-01-16T12:46:19+5:30

विद्यार्थिनी असतानाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा हा क्षण तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.

PMC Election Results 2026 Sai Thopte a young BJP candidate from Pune just 22 years old, wins | PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी

PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी

पुणे : अवघ्या २२ वर्षांच्या सई थोपटे हिच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून भारतीय जनता पक्षाकडून सई थोपटे हिला महानगरपालिकेचं अधिकृत तिकीट देण्यात आलं असून, ती सध्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार ठरली होती. अखेर सईने प्रभाग ३६ मधून विजय मिळवला आहे. 

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

सई थोपटे सध्या पुण्यातील नामांकित Symbiosis महाविद्यालयमध्ये बीबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. रोजच्याप्रमाणे कॉलेजचा वर्ग सुरू असतानाच तिला पक्षाकडून फोन आला आणि उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती मिळाली. अचानक मिळालेल्या या बातमीने सईचा आनंद गगनात मावेनासा झाला. वर्गातील मित्र-मैत्रिणींनी तिचं अभिनंदन केलं आणि त्यानंतर सई थेट आपल्या प्रभागात पोहोचली. विद्यार्थिनी असतानाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा हा क्षण तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.

विद्यार्थी चळवळीतून घडलेलं नेतृत्व

सई थोपटे गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदशी सक्रियपणे जोडलेली आहे. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून तिने पुण्यात विविध आंदोलनं, सामाजिक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक सुविधा, करिअरच्या संधी, तरुणांचे हक्क यावर तिने सातत्याने ठाम भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांमध्ये काम करताना मिळालेला अनुभव, संवादकौशल्य आणि संघटन क्षमता यामुळेच तिचं नेतृत्व अधिक ठळकपणे पुढे आलं.

राजकीय वारसा आणि संघटनात्मक पाठबळ

सई थोपटे हिला राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. तिचे वडील प्रशांत थोपटे हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय पदाधिकारी आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी उपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा निवडणूक संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पर्वती, सहकारनगर आणि धनकवडी परिसरात घराघरात पक्ष पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पक्षनिष्ठेची आणि कार्यपद्धतीची दखल घेत पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सई थोपटे हिला पुणे महानगरपालिकेत प्रतिनिधित्वाची संधी दिल्याचं बोललं जात आहे.

भाजपचा पॅनल विजयी प्रभाग क्र 36

विजयी उमेदवार 

- वीणा घोष 
- शैलजा अरुण भोसले
- सई थोपटे 
- महेश वाबळे

Web Title : 22 वर्षीय भाजपा उम्मीदवार सई थोपटे ने पुणे पीएमसी चुनाव जीता

Web Summary : 22 वर्षीय भाजपा उम्मीदवार सई थोपटे ने पुणे के वार्ड 36 (सी) से जीत हासिल की। सिम्बायोसिस की छात्रा और एबीवीपी कार्यकर्ता एक राजनीतिक परिवार से हैं। उनकी जीत का श्रेय उनकी छात्र सक्रियता और परिवार की भाजपा पृष्ठभूमि को जाता है।

Web Title : 22-Year-Old BJP Candidate Sai Thopte Wins Pune PMC Election

Web Summary : Sai Thopte, a 22-year-old BJP candidate, won from Pune's Ward 36(C). The Symbiosis student and ABVP activist comes from a political family. Her victory is attributed to her student activism and family's BJP background.