PMC Election Results 2026: धंगेकर, मोरे, बागुल, बागवे, बाबर; पुण्यात क्राॅस व्होटिंगमुळे अनेक दिग्गजांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 10:01 IST2026-01-17T10:00:26+5:302026-01-17T10:01:04+5:30

PMC Election Results 2026 भाजपसह सर्वच पक्षांतील नाराज कार्यकर्त्यांनी केलेल्या क्रॉस व्होटिंगमुळे अनेक ठिकाणी माजी नगरसेवकांचे धक्कादायक निकाल लागले आहेत

PMC Election Results 2026 ravindra dhangekar vasant more aba bagul avinash bagwe sainath babar; Many bigwigs lost due to cross voting in Pune | PMC Election Results 2026: धंगेकर, मोरे, बागुल, बागवे, बाबर; पुण्यात क्राॅस व्होटिंगमुळे अनेक दिग्गजांचा पराभव

PMC Election Results 2026: धंगेकर, मोरे, बागुल, बागवे, बाबर; पुण्यात क्राॅस व्होटिंगमुळे अनेक दिग्गजांचा पराभव

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पुण्याच्या इतिहासातील सर्वांधिक १२० जागा मिळविण्याचा विक्रम भाजपने केला आहे. या निकालात अनेक प्रभागांमध्ये चारपैकी तीन, दोन किंवा एका जागी अन्य पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे १४ पेक्षा अधिक प्रभागांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपसह सर्वच पक्षांतील नाराज कार्यकर्त्यांनी केलेल्या क्रॉस व्होटिंगमुळे अनेक ठिकाणी माजी नगरसेवकांचे धक्कादायक निकाल लागले आहेत.

पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्ते इच्छुक होते, तर अनेक माजी नगरसेवकांनी प्रभागातील इतर सक्षम कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकीची तयारी केली होती. पण, भाजपने ५३ माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना उमेदवारी दिली नाही. त्यात इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या सुमारे दोन डझन जणांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपमध्ये नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढत असले तरी १५ जागांवर घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे होते. शिंदेसेना स्वबळावर लढली तर काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसेे एकत्रपणे महाआघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये नाराज कार्यकर्त्यांची फळी होती. त्या नाराज कार्यकर्त्यांना हेरण्याचे काम विरोधी पक्षातील जाणकारांनी केले होते. ज्या प्रभागात आपल्याला जास्त मते मिळतील, तिथे तुम्हाला चालवतो. तुमच्या प्रभागात अंतर्गत यंत्रणेद्वारे आम्हाला चालवा, असे निरोप मतदानाच्या रात्री देण्यात आले होते. त्यामुळे १४ पेक्षा अधिक प्रभागांमध्ये क्रॉस व्होटिंगमुळे अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.

या दिग्गजांचा झाला पराभव

या निवडणुकीत उषा कळमकर, संजय भोसले, नाना भानगिरे, वसंत मोरे, बाळासाहेब बोडके, अविनाश बागवे, दत्तात्रय धनकवडे, आबा बागुल, सुभाष जगताप, अश्विनी कदम, रेश्मा भोसले, अर्चना मुसळे, बंडू केमसे, प्रकाश ढोरे, योगेश ससाणे, धनराज घोगरे, रत्नप्रभा जगताप, नंदा लोणकर, अभिजित शिवरकर, साईनाथ बाबर, प्रतिभा धंगेकर, सुनील खाटपे, धनंजय जाधव, अशोक हरणावळ, गिरिराज सावंत, गंगाधर बधे, प्रकाश कदम, सचिन भगत, सुनीता गलांडे, संदीप जऱ्हाड, सायली माळवे, जयश्री मारणे, अस्मिता शिंदे, राम बोरकर, सुशील मेंगडे.

Web Title : पुणे चुनाव परिणाम: क्रॉस-वोटिंग से दिग्गजों को भारी नुकसान

Web Summary : भाजपा ने पुणे में ऐतिहासिक जीत हासिल की, लेकिन क्रॉस-वोटिंग के कारण कई प्रमुख नेताओं को हार का सामना करना पड़ा। नाराज सदस्यों ने रणनीतिक रूप से अपने ही खिलाफ मतदान किया, जिससे पूर्व पार्षदों पर असर पड़ा।

Web Title : Pune Election Upset: Cross-Voting Causes Major Losses in PMC 2026

Web Summary : BJP secured a historic Pune victory, but cross-voting led to unexpected defeats for prominent figures across parties. Disgruntled members strategically voted against their own, impacting former corporators and altering results in over fourteen wards.