PMC Election Results 2026: 'एकला चलो रे', भूमिकेला पुणेकरांनी नाकारले; स्वबळाचा निर्णय शिंदेसेनेला महागात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 11:06 IST2026-01-17T11:05:51+5:302026-01-17T11:06:26+5:30

PMC Election Results 2026 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचे देखील शहरात आयोजन करण्यात आले असतानाही शिंदेसेनेला भोपळा मिळाला

PMC Election Results 2026 Pune residents rejected the idea of 'going it alone'; Shinde Sena's decision to stand alone cost them dearly | PMC Election Results 2026: 'एकला चलो रे', भूमिकेला पुणेकरांनी नाकारले; स्वबळाचा निर्णय शिंदेसेनेला महागात पडला

PMC Election Results 2026: 'एकला चलो रे', भूमिकेला पुणेकरांनी नाकारले; स्वबळाचा निर्णय शिंदेसेनेला महागात पडला

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेना स्वबळावर लढली. त्यामुळे शिंदेसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे भाजपबरोबरची युती तोडण्याचा फटका शिंदेसेनेला बसला असून त्यांच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शिंदेसेनेने भाजपकडे ३५ जागांची मागणी केली होती. पण, भाजपने प्रत्यक्षात १५ जागा देण्याची तयारी दर्शवली. सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिंदेसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शिंदेसेनेने भाजपबरोबर युती करू नये. यासाठी माजी आमदार रवींद्र धंगेकर आग्रही होते. त्यामुळेच भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही. शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी टेबल टाकून एबी फॉर्म दिले. ११९ जागांवर शिंदेसेनेने उमेदवार दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचे देखील शहरात आयोजन करण्यात आले होते. असे असताना देखील शिंदेसेनेला भोपळाही फोडता न आल्याने मतदारांनी शिंदेसेनेच्या ‘एकला चलो रे’च्या भूमिकेला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

युतीमध्ये लढले असते तर किमान शिंदेसेनेच्या काही जागा निवडून आल्या असता. रवींद्र धंगेकर यांच्या आग्रहामुळे युती झाली नाही. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि मुलगा यांचा या निवडणुकीत पराभव झाला. स्वबळाचा निर्णय घेताना जमिनीवरील वास्तव, पक्षाची स्वतंत्र मतपेढी आणि कार्यकर्त्यांची ताकद यांचा योग्य अंदाज न आल्याचे निकालावरून स्पष्ट होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिंदेसेनेला शहरातील नेतृत्व, संघटना आणि युतीचे राजकारण यावर नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title : पुणे चुनाव में शिंदे सेना का अकेले चलना बुरी तरह विफल।

Web Summary : पुणे नगर निगम चुनाव में अकेले लड़ने का शिंदे सेना का फैसला उल्टा पड़ा। उम्मीदवार उतारने और रैलियों के बावजूद, वे एक भी सीट जीतने में विफल रहे। सीटों के बंटवारे पर असहमति के कारण बीजेपी के साथ गठबंधन टूट गया, जिसके परिणामस्वरूप हार हुई और आत्मनिरीक्षण की आवश्यकता पड़ी।

Web Title : Shinde Sena's solo run in Pune election fails miserably.

Web Summary : Shinde Sena's decision to contest Pune Municipal Corporation elections independently backfired. Despite fielding candidates and rallies, they failed to win a single seat. Disagreement over seat sharing led to breaking the alliance with BJP, resulting in defeat and need for introspection.