PMC Election Results 2026: अजितदादांशी युतीला विरोध करत सोडली होती साथ; काँग्रेसचे प्रशांत जगताप यांचा मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:13 IST2026-01-16T12:09:25+5:302026-01-16T12:13:54+5:30

पुणे महापालिकेला तगडा विरोधी पक्षनेता मिळाला; भाजपच नाही, अजित पवारांनाही विरोध करणारा उमेदवार जिंकला...

PMC Election Results 2026: Left the alliance opposing alliance with Ajitdada; Congress's Prashant Jagtap wins big | PMC Election Results 2026: अजितदादांशी युतीला विरोध करत सोडली होती साथ; काँग्रेसचे प्रशांत जगताप यांचा मोठा विजय

PMC Election Results 2026: अजितदादांशी युतीला विरोध करत सोडली होती साथ; काँग्रेसचे प्रशांत जगताप यांचा मोठा विजय

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने मोठी झेप घेतली असून, शहराचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी प्रभाग क्रमांक १८ (ड) मधून दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत जगताप यांनी भाजपच्या अभिजीत शिवरकर यांचा पराभव करत पुण्यात काँग्रेसचे विजयाचे खाते उघडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढत देत तब्बल १८०० मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

तत्त्वासाठी सोडली साथ, मतदारांनी दिली पावती प्रशांत जगताप यांचा हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) असताना त्यांनी अजित पवार गटाशी होणाऱ्या आघाडीला तीव्र विरोध केला होता. "ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्याशी युती नको," अशी ठाम भूमिका घेत त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयावर पुणेकरांनी विजयाची मोहोर उमटवली आहे.

बाळासाहेब शिवरकरांच्या मुलाला दिला धक्का काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अभिजीत शिवरकर यांनी मतदानापूर्वी अवघे काही दिवस उरले असताना काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना प्रशांत जगताप यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते. मात्र, जगताप यांनी 'होम ग्राऊंड'वर शिवरकरांना पराभवाची धूळ चारली आहे.

जगताप कुटुंबात संमिश्र वातावरण एकीकडे प्रशांत जगताप यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, दुसरीकडे त्यांच्या आई आणि ज्येष्ठ नेत्या रत्नप्रभा जगताप या सध्या पराजयाच्या छायेत आहेत. त्यांच्या प्रभागात भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतल्याने जगताप कुटुंबासाठी हा निकाल संमिश्र ठरण्याची शक्यता आहे.

Web Title : कांग्रेस के प्रशांत जगताप ने जीता पीएमसी चुनाव, अजित पवार गठबंधन को नकारा।

Web Summary : प्रशांत जगताप ने पुणे महानगरपालिका चुनाव में 1800 वोटों से बड़ी जीत हासिल की। उन्होंने अजित पवार गठबंधन का विरोध किया और कांग्रेस में शामिल हो गए, भाजपा के अभिजीत शिवरकर को हराया। उनकी मां को संभावित हार का सामना करना पड़ रहा है।

Web Title : Congress' Prashant Jagtap Wins PMC Election, Defying Ajit Pawar Alliance.

Web Summary : Prashant Jagtap secured a significant victory in the Pune Municipal Corporation election, winning by 1800 votes. He opposed the Ajit Pawar alliance and joined Congress, defeating BJP's Abhijit Shivarkar. His mother, however, faces potential defeat.