PMC Election Results 2026: अखेर मतमोजणीला सुरुवात; पुण्यात पोस्टल मतदानात भाजपची आघाडी, निकालाची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:12 IST2026-01-16T10:10:57+5:302026-01-16T10:12:06+5:30

PMC Election Results 2026 पोस्टल मतदानात भाजपने आघाडी घेतली असून १२ ठिकणी आघाडी घेतली आहे

PMC Election Results 2026 Finally, the counting of votes has begun; BJP is leading in postal voting in Pune, the curiosity about the results is at its peak | PMC Election Results 2026: अखेर मतमोजणीला सुरुवात; पुण्यात पोस्टल मतदानात भाजपची आघाडी, निकालाची उत्सुकता शिगेला

PMC Election Results 2026: अखेर मतमोजणीला सुरुवात; पुण्यात पोस्टल मतदानात भाजपची आघाडी, निकालाची उत्सुकता शिगेला

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) शहरातील १५ ठिकाणी होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीसाठी मतमोजणी सर्वाधिक २० फेऱ्या या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांमध्ये होणार असून सर्वांत कमी १२ फेऱ्या बिबवेवाडी, कसबा विश्रामबाग आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांच्या होणार आहेत. त्यामुळे पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

पुण्यात पोस्टल मतदानात भाजपने आघाडी घेतली आहे. पुण्यात १२ ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी ५ जागांवर आघाडीवर आहे.  पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. या निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान झाले. मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. तर साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

निवडणुकीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा विचार करता सर्वात कमी चार फेऱ्या १३ प्रभागांमध्ये होणार असून येथील निकाल लवकर जाहीर होईल. पाचसदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमध्ये १० फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे या प्रभागाच्या निकालाला विलंब होऊ शकतो. क्षेत्रीय कार्यालयनिहाय दोनच प्रभागांचा समावेश असलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक ३९ अप्पर-सुपर इंदिरानगर व प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी मध्ये प्रभागनिहाय सर्वाधिक प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग क्रमांक २०,२१,२६) व कसबा विश्रामबागवाडा (प्रभाग २५,२७,२८) क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत, तसेच कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वांत कमी १२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील मतमोजणी लवकर पूर्ण होऊन या प्रभागांचा निकाल सर्वांत लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title : पीएमसी चुनाव 2026: मतगणना शुरू; डाक मतों में भाजपा आगे

Web Summary : पुणे में पीएमसी चुनाव की मतगणना 15 स्थानों पर शुरू। शुरुआती रुझानों में डाक मतों में भाजपा आगे। दोपहर तक परिणाम आने की उम्मीद, वार्ड के अनुसार अलग-अलग राउंड गिनती से घोषणा समय प्रभावित।

Web Title : PMC Election 2026: Counting Begins; BJP Leads in Postal Votes

Web Summary : Pune's PMC election counting starts across 15 locations. Initial trends show BJP leading in postal votes. Results expected by afternoon, with varying round counts per ward impacting declaration times.