PMC Election Results 2026: पुण्याच्या बहुचर्चित कसबा-विश्रामबागमध्ये भाजपचे वर्चस्व; काँग्रेस, मनसे, शिवसेना, उद्धवसेनेला भोपळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:39 IST2026-01-17T14:38:12+5:302026-01-17T14:39:48+5:30
PMC Election Results 2026 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या एकूण १२ जागांपैकी १० जागांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला

PMC Election Results 2026: पुण्याच्या बहुचर्चित कसबा-विश्रामबागमध्ये भाजपचे वर्चस्व; काँग्रेस, मनसे, शिवसेना, उद्धवसेनेला भोपळा
पुणे : कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील तीनही प्रभागांत पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या एकूण १२ जागांपैकी १० जागांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस, मनसे, शिवसेना तसेच उद्धवसेना यांना एकही जागा जिंकता आली नाही. भाजपच्या विजयामुळे टिळक रस्त्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शनिवार पेठ व महात्मा फुले मंडई (प्रभाग २५), नवी पेठ-पर्वती (प्रभाग २७) आणि जनता वसाहत-हिंगणे खुर्द (प्रभाग २८) हे प्रभाग येतात. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रभाग २५ मध्ये भाजपने सर्वच गटांत आघाडी घेतली. गट ‘अ’मध्ये स्वप्नाली पंडित, ‘ब’मध्ये राघवेंद्र मानकर, ‘क’मध्ये स्वरदा बापट आणि ‘ड’मध्ये कुणाल टिळक यांनी विजय मिळविला. प्रभाग २७ मध्ये काही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या, मात्र सर्व गटांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग २८ मध्ये भाजपला दोन जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीने गट ‘ब’ आणि ‘क’मध्ये विजय नोंदविला. दरम्यान, मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता; मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
प्रभाग २५ विजयी उमेदवार
स्वप्नाली पंडित (भाजप)
बापू मानकर (भाजप)
स्वरदा बापट (भाजप)
कुणाल टिळक (भाजप)
प्रभाग क्रमांक २७ विजयी उमेदवार
अमर आवळे (भाजप)
स्मिता वस्ते (भाजप)
लता गौड (भाजप)
धीरज घाटे (भाजप)
प्रभाग २८ विजयी उमेदवार
रिठे वृषाली आनंद (भाजप)
गदादे प्रिया शिवाजी (राष्ट्रवादी)
सुरज नथुराम लोखंडे (राष्ट्रवादी)
अॅड. प्रसन्न जगताप (भाजप)