PMC Election Results 2026: 'नेकी का काम आंदेकर का नाम', घोषणा देणारा बंडू आंदेकर १५० मतांचा आकडाही पार करू शकला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 10:34 IST2026-01-17T10:34:00+5:302026-01-17T10:34:33+5:30
PMC Election Results 2026 लोकशाही मार्गानेच जनतेच्या पाठबळावर आपण निवडणूक लढवत असल्याचा दावा करणाऱ्या बंडू आंदेकरला १४३ मतांवर समाधान मानावे लागले

PMC Election Results 2026: 'नेकी का काम आंदेकर का नाम', घोषणा देणारा बंडू आंदेकर १५० मतांचा आकडाही पार करू शकला नाही
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पुण्याच्या इतिहासातील सर्वांधिक १२० जागा मिळविण्याचा विक्रम भाजपने केला आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत पुण्याच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग २४ ची निवडणूक राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी होती. या प्रभागातून कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
''नेकी का काम आंदेकर का नाम”, “बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय”, “आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत” अशा घोषणा त्याने दिल्या होत्या. तसेच त्याने “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही” अशी भूमिका स्पष्ट केली होती. लोकशाही मार्गानेच जनतेच्या पाठबळावर आपण निवडणूक लढवत असल्याचा दावा त्याने केला होता. इतकेच नाही तर त्याने यावेळी वनराज आंदेकर जिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या. या बंडू आंदेकरला महापालिका निवडणुकीत केवळ १४३ मते मिळाली आहेत. विकासकामाला मत म्हणणाऱ्या बंडू आंदेकरला लोकांची मने जिंकता आली नाहीत. प्रभाग २४ मधून त्यांनी बंडूला स्पष्टपणे नाकारल्याचे दिसून आले. प्रभाग २४ मधून 'ड' गटातून भाजपचे गणेश बिडकर १८, ६४३ मतांनी निवडून आले. तर दुसऱ्या नंबरवर शिवसेनेच्या प्रणव रवींद्र धंगेकरला ९ हजार ३९५ मते मिळाली त्याच गटात बंडू आंदेकरला अत्यंत कमी मते मिळवत १४३ वर समाधान मानावे लागले.
प्रभाग २४ - कसबा गणपती- कमला नेहरू - केईएम रुग्णालय
(अंतिम आकडेवारी)
अ)
कल्पना बहिरट (भाजप), २०३८२
पूनम काळोखे (राष्ट्रवादी), ५०५९
वैशाली अफुवाले (शिवसेना), ५१७८
रंजना खडके (शिवसेना उबाठा) ३२०५
विजयी - कल्पना बहिरट
ब)
उज्ज्वला यादव (भाजप), १७०७१
सुजाता शेट्टी (राष्ट्रवादी), ५९५३
मेघना तरवडे (शिवसेना),४८९७
शिफा शेख (काँग्रेस) ४८८२
विजयी: उज्वला यादव
क)
देवेंद्र वडके (भाजप), १४६७७
जयप्रकाश फुलावरे (राष्ट्रवादी), ३७५८
प्रशांत मते (शिवसेना),,४४०८
राजेश मोरे (शिवसेना उबाठा), २२०४
नितीन परतानी (काँग्रेस), ८६१९
विजयी: वडके
ड)
गणेश बिडकर (भाजप), १८६४३
गणेश नवथरे (राष्ट्रवादी), २७८०
प्रणव धंगेकर (शिवसेना), ९३९५
राहुल शर्मा (काँग्रेस), ३०३०
किरण कंद्रे (आप) १३७
सूर्यकांत आंदेकर १४३
विजयी: गणेश बिडकर