PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:50 IST2026-01-09T13:48:17+5:302026-01-09T13:50:20+5:30

PMC Election 2026 शिवसेना मोठा पक्ष आहे. डरपोक राजकारणाला शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत. ते बाळासाहेबांचे वाघ आहेत.

PMC Election 2026 Shiv Sena is fighting on its own, so no one should take it lightly; Eknath Shinde warns | PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा

PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. कात्रज येथे उमेदवारांच्या प्रचारसाठी ते दाखल झाले आहेत. इथून पुढे त्यांचा रोड शो देखील होणार आहे. कात्रज येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना स्वबळावर लढत आहे म्हणून हलक्यात घेऊ नका असा इशारा त्यांनी इतर पक्षांना दिला आहे. 

शिंदे म्हणाले, महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना एकटी लढत आहे. म्हणून इतरांनी कुणीही आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्हाला कमजोर समजू नका. काही लोक स्वतःला मालक  समजतात. आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही एकदा आपटले की, पुन्हा उठत नाही. त्यामुळे आम्हाला कमी समजू नका. शिवसेना मोठा पक्ष आहे. डरपोक राजकारणाला शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत. ते बाळासाहेबांचे वाघ आहेत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारी शिवसेना नाही. नगरपरिषद मध्ये मविआ कुठेही दिसत नाहीत. त्यांनी पराभव स्वीकारला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

लाडकी बहीण बंद होणार नाही

आपला अजेंडा विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणे आहे. अनेक कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आहेत. चांदणी चौकात खूप ट्राफीक होत असते. मी इथून जाताना लोकांनी मला थांबवून या व्यथा सांगितल्या होत्या. मी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आता तिकडचं ट्राफिक दूर झालं आहे. कात्रजच ट्राफिक दूर करणार आहोत. विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होत, कि आम्ही २०० पार करणार तेव्हा २३२ आणले. शेवटी सर्व काही जनतेच्या हातात आहे. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु केली. अनेकांनी त्याला विरोध केला. पण तुमचा एकनाथ खमक्या भाऊ बसला होता. त्यामुळे ती सुरु झाली. कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एक बार मैने कमिटमेंट कर दि तो मैं अप ने आप कि भी नाही सुनता असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले. 

नेहमी कार्यकर्ता म्हणून काम केले पाहिजे

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मुख्यमंत्री, आमदार, महापौर कोणाच्याही डोक्यात नेता म्हणून कधीही हवा जात कामाला नये. नेहमी कार्यकर्ता म्हणून काम केले पाहिजे. आपला पाठीचा कणा कार्यकर्ता असतो. आपण शिवसैनिकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. कार्यकर्त्याला मानसन्मान मिळाला पाहिजे. 

घरांचा टॅक्स आपण कमी करू. 

कुणीतरी इथं प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याच भाष्य केलं होत. पण नगरविकास खात माझ्याकडे आहे. आपण घरांचा टॅक्स माफ करून टाकू. बघतो करतो आपल्याकडे असं नाही. रिसल्ट ऑन द स्पॉट असं काम आपण करतो. घरांचा टॅक्स आपण कमी करू. ट्राफिक मुक्त पुणे, कात्रज आपण करू, अनेक वर्ष सत्तेत असणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे. या समस्या का राहिल्या आहेत. नगरविकासच्या माध्यमातून जे काही रद्द करता येईल ते आपण करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे.  

Web Title : पीएमसी चुनाव 2026: शिंदे ने शिवसेना को कम आंकने के खिलाफ चेतावनी दी।

Web Summary : पुणे में चुनाव प्रचार करते हुए एकनाथ शिंदे ने आगामी पीएमसी चुनावों में शिवसेना की ताकत का दावा किया। उन्होंने यातायात समाधान और संपत्ति कर कटौती सहित विकास योजनाओं पर प्रकाश डाला, कार्रवाई और पार्टी कार्यकर्ताओं के लिए समर्थन का वादा किया। उन्होंने आश्वासन दिया कि लाडकी बहिन योजना जारी रहेगी।

Web Title : PMC Election 2026: Shinde warns against underestimating Shiv Sena's solo fight.

Web Summary : Eknath Shinde, campaigning in Pune, asserted Shiv Sena's strength in the upcoming PMC elections. He highlighted development plans, including traffic solutions and property tax reductions, promising action and support for party workers. He assured that Laadki Bahin scheme will continue.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.