PMC Election 2026 : पुणेकरांनो, मत देण्याआधी हे प्रश्न लक्षात ठेवाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:03 IST2026-01-15T14:01:54+5:302026-01-15T14:03:31+5:30
नागरिक म्हणूनही ते तुमचे आद्य कर्तव्य आहे. प्रश्नांची जाण ठेवणाऱ्या उमेदवाराला मतदानरूपी आशीर्वाद द्या. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. घरातून बाहेर पडा. आपला हक्क बजावा.

PMC Election 2026 : पुणेकरांनो, मत देण्याआधी हे प्रश्न लक्षात ठेवाच
पुणे - आज मतदान.. तुम्हीच आज नायक आहात, निर्णायक आहात... लोकशाही बळकट करण्याची संधी आज तुमच्या हातात आहे. मत कुणालाही द्या, पण मतदान नक्की करा... तुमचे मत भविष्यातील पुणे घडविणारे असणार आहे. नागरिक म्हणूनही ते तुमचे आद्य कर्तव्य आहे. प्रश्नांची जाण ठेवणाऱ्या उमेदवाराला मतदानरूपी आशीर्वाद द्या. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. घरातून बाहेर पडा. आपला हक्क बजावा.
मतदारांनो हे प्रश्न नक्की वाचा..
* शहरातील कोंडी फुटणार कशी?
* महिलांच्या स्वच्छतागृहांचे काय?
* पाणीप्रश्न : कधी येते, कधीही जाते
* शहरातील जुन्या वाड्यांचे काय?
* ज्येष्ठ नागरिकांना अपुऱ्या सुविधा
* रस्ते कधी होणार खड्डेमुक्त?
* शहरातील कचरा टाकायचा कुठे?
* पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट
* वाढती गुन्हेगारी रोखणार कशी?
* बागा, उद्याने आहेत कुठे?
दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. तर पिंपरी चिंचवडच्या ३२ प्रभागांसाठी १२८ जागा आहेत. पुण्याच्या ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पिंपरीत ६९२ उमेदवार लढत आहेत. आज सकाळपासून दोन्हीकडे उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे.