PMC Election 2026: पुण्यात पैसे वाटप करताना राष्ट्रवादी उमेदवार पुत्रासह १५ जण अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:48 IST2026-01-08T15:46:46+5:302026-01-08T15:48:50+5:30

- या प्रकरणातील नीलेश साहेबराव मतदानासाठी नागरिकांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस

PMC Election 2026: 15 people including NCP candidate's son arrested while distributing money | PMC Election 2026: पुण्यात पैसे वाटप करताना राष्ट्रवादी उमेदवार पुत्रासह १५ जण अटक

PMC Election 2026: पुण्यात पैसे वाटप करताना राष्ट्रवादी उमेदवार पुत्रासह १५ जण अटक

बाणेर :पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर-पाषाण परिसरात मतदानासाठी नागरिकांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकाच्या पुत्रासह एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बाणेर पोलिस ठाण्यात गुर.नं. ०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १७१, १७४ व २२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी नीलेश साहेबराव मतदानासाठी नागरिकांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस बेलदार (वय ४५), पोलिस शिपाई, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा पुणे शहर आहेत. पाषाण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रानमळा हॉटेलच्या मागे, साईनगर, सोमेश्वरवाडी, परिसरात हा प्रकार घडला.

आरोपी किरण बाबूराव चांदेरे (रा. वीरभद्र नगर, बाणेर) व इतर १४ जणांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रलोभन दाखविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश रायकर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग करत आहेत. निवडणूक काळात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांची कडक नजर असल्याचा असल्याचे सांगितले. निवडणूकीत उमेदवारांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून पैसे वाटणे, प्रलोभन देण्याचे प्रकार दिसल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title : पीएमसी चुनाव: पैसे बांटते हुए राकांपा उम्मीदवार का बेटा, 15 गिरफ्तार

Web Summary : पीएमसी चुनाव से पहले, बानेर-पाषाण में राकांपा उम्मीदवार के बेटे सहित 15 लोगों को कथित तौर पर मतदाताओं को रिश्वत देने के आरोप में गिरफ्तार किया गया। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है, नागरिकों से ऐसे मामलों की सूचना देने का आग्रह किया है।

Web Title : PMC Election: NCP Candidate's Son, 15 Arrested for Distributing Money

Web Summary : Ahead of PMC elections, 15 individuals, including an NCP candidate's son, were arrested in Baner-Pashan for allegedly bribing voters. Police filed a case and are investigating the matter, urging citizens to report such incidents.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.