टिळक रस्त्यावर १, २ ढोल-ताशा पथकांना परवानगी; विसर्जन मिरवणूकही यंदा रात्री १२ च्या आत संपणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:44 IST2025-08-09T16:44:37+5:302025-08-09T16:44:48+5:30
टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत यंदा एक-दोन ढोल-ताशा पथकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे

टिळक रस्त्यावर १, २ ढोल-ताशा पथकांना परवानगी; विसर्जन मिरवणूकही यंदा रात्री १२ च्या आत संपणार?
पुणे: पुण्यातील विसर्जन सोहळ्यात टिळक रस्त्यावरील मिरवणुका अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत सुरु असतात. मागील वर्षी ३० ते ३२ तासांचा रेकॉर्ड झाला होता. यंदा टिळक रस्त्याववरील विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवण्याचा प्रयत्न मंडळ आणि पोलिस प्रशासन करणार आहेत. पोलिस प्रशासन आणि टिळक रस्त्यावरील मंडळांमध्ये बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत यंदा एक-दोन ढोल-ताशा पथकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. मिरवणुक लवकर संपवावी म्हणून यंदा टिळक रस्ता गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. दरवर्षी टिळक रस्त्यावरील पूरम आणि जेधे चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अनेक मंडळांना तासंतास या चौकांमध्ये थांबून राहावे लागते. त्यामुळे आता जेधे चौक आणि पूरम चौकात ढोल-ताशासह साउंड सिस्टीम (डिजे) वाजविण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेधे चौकातून सहभागी होणाऱ्या मंडळांनी ५ तासात, तर पूरम चौकातून सहभागी होणाऱ्या मंडळाने ४ तासात मिरवणूक संपवावी, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
दरवर्षी पूरम आणि जेधे चौकातून जवळपास २०५ मंडळ जातात. मिरवणुक लवकर संपवावी म्हणून यंदा टिळक रस्ता गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. दुर्घटना टाळण्याठी विक्रेत्यांची मुख्य रस्त्याऐवजी अंतर्गत रस्त्यावर व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजता संपविण्यासाठी मंडळ आणि पोलिस प्रशासन प्रयत्न करणार आहेत.