नवले ब्रिज-कात्रज रस्त्यावर भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 14:33 IST2022-03-18T14:29:54+5:302022-03-18T14:33:24+5:30
आंबेगाव बुद्रुक-नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरूच...

नवले ब्रिज-कात्रज रस्त्यावर भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
धनकवडी :आंबेगाव बुद्रुक-नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून अपघातांचे हॉटस्पॉट ठरलेल्या या परिसरात गुरुवारी रात्री आणखी एक अपघात झाला. कात्रज बाह्य वळण मार्गावरील नवले ब्रिजकडून कात्रजकडे जाणाऱ्या मार्गावर अशोक लेलँट शोरूम समोर भरधाव ट्रक डिव्हायटरला धडकून पलटी झाला. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला असून चालकासह एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महेंद्र चौधरी रजावर असे मृत व्यक्ती चे नाव असून रंजन कुमार मंडल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी चालक जसवंत उराव राहणार सुस, पाषाण विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रक हा नवले ब्रीजकडून कात्रजकडे निघाला होता. अशोक लेलँड शोरूम समोरून जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले भरधाव ट्रक डिव्हायटरला धडकून पलटी झाला घटनेची माहिती मिळताच, भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. या अपघातानंतर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रक बाजूला काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.