बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी माेदींची सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:40 IST2019-04-16T20:38:12+5:302019-04-16T20:40:28+5:30

अनेक वर्षे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गड असलेल्या बारामतीला धक्का देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी बारामतीच्या भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ उद्या सभा घेणार आहेत.

modi will be in baramati for campaigning of kanchan kul | बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी माेदींची सभा

बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी माेदींची सभा

पुणे : अनेक वर्षे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गड असलेल्या बारामतीला धक्का देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी बारामतीच्या भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ उद्या सभा घेणार आहेत. अकलूज येथील विजयसिंह माेहिते पाटील क्रीडा संकुला समाेरील मैदानावर उद्या सकाळी 9 वाजता ही सभा हाेणार आहे. कांचन कुल यांच्याबराेबरच माढा लाेकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार देखील माेदी करणार आहेत. 

नरेंद्र माेदी यांच्या महाराष्ट्रात झालेल्या सभांमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. भाजपाच्या सर्वच नेत्यांनी बारामती जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बारामती मधून सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवार आहेत. बारामतीबराेबरच माढा हा सुद्धा राष्ट्रवादीचा गड मानला जाताे. शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुद्धा मधल्या काळात हाेती. त्यामुळे या दाेन्ही जागा जिंकण्यासाठी माेदींबराेबरच केंद्रातील अनेक नेते बारामतीत सभा घेणार आहेत. 

माेदींबराेबरच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा.  केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्री स्मृती इराणी आदी बारामतीमध्ये सभा घेणार आहेत.  माेदी राज्यातल्या पहिल्या सभेपासून पवारांवर टीका करत असल्याने उद्या माेदी काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: modi will be in baramati for campaigning of kanchan kul