Pune Metro: मेट्रोमुळे गणेश भक्तांना ट्राफिकमधून दिलासा; एका दिवसात तब्बल ३ लाख नागरिकांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:00 IST2025-09-05T16:58:47+5:302025-09-05T17:00:25+5:30

मेट्रोने गणेशोत्सवात पहाटे दोनपर्यंत सेवा सुरू ठेवण्यास ३० ऑगस्टपासून सुरू केल्याने त्याचा फायदा प्रवाशांना झाला आहे.

Metro brings relief to Ganesh devotees from traffic; As many as 3 lakh citizens travel in a day | Pune Metro: मेट्रोमुळे गणेश भक्तांना ट्राफिकमधून दिलासा; एका दिवसात तब्बल ३ लाख नागरिकांचा प्रवास

Pune Metro: मेट्रोमुळे गणेश भक्तांना ट्राफिकमधून दिलासा; एका दिवसात तब्बल ३ लाख नागरिकांचा प्रवास

पुणे : देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मेट्रो सोयीची ठरत आहे. गुरुवारी (दि. ४) एका दिवसात ३ लाख ९७ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. यामुळे प्रवाशांचा नवा उच्चांक गाठला. यामध्ये सर्वाधिक ५४ हजार प्रवाशांनी मंडई स्थानकावरून प्रवास केला. मेट्रोमुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मुक्त झाले असून, देखावे पाहणे सोयीचे झाले आहे.

सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू आहे. त्यामुळे भाविकांना थेट मध्यवर्ती भागात गणपती देखावे पाहण्यासाठी सोयीचे झाले आहे. गेल्या वर्षी गणपती विसर्जनादिवशी उच्चांकी तीन लाख ४६ हजार प्रवाशांनी मेट्रोकडून प्रवास केला होता. यंदा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज होता. मेट्रोने गणेशोत्सवात पहाटे दोनपर्यंत सेवा सुरू ठेवण्यास ३० ऑगस्टपासून सुरू केली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना झाला आहे.

‘मंडई’ स्थानकावर गर्दी 

मध्यवर्ती भागात येणाऱ्या भाविकांकडून मंडई मेट्रो स्थानकाला जास्तीचे प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे या स्थानकावरून गुरुवारी ५४ हजार ६१३ प्रवाशांनी प्रवास केला. मंडई मेट्रो स्टेशन शहराच्या मध्यवस्तीत गणपती पाहण्यासाठी जवळ पडते. त्यामुळे प्रवाशांकडून या मेट्रो स्टेशनचा वापर सर्वाधिक केला जात आहे. त्यादृष्टीने मेट्रो प्रशासनाकडून या स्थानकांत सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवासी संख्या

मेट्रो स्थानक ---- प्रवासी संख्या

मंडई - ५४,६१३
पीसीएमसी - ४०,९७०
स्वारगेट - ३४,५३५
रामवाडी - ३०,३०९
पीएमसी - २५,३३८

मंडई मेट्रो स्टेशनवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी मेट्रोकडून तयारी केले आहे. नागरिकांनी कसबा स्थानकावर उतरून मध्यवर्ती भागात जावे. तर घरी जाताना मंडई स्थानकावरून परतीचा प्रवास करावा. जेणेकरून प्रवास करताना सोयीचे होणार आहे. -चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) महामेट्रो

 

Web Title: Metro brings relief to Ganesh devotees from traffic; As many as 3 lakh citizens travel in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.