Maharashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभांचा करिष्मा आणि पक्षबांधणीवर धावणार मनसेचं इंजिन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 07:00 AM2019-10-19T07:00:00+5:302019-10-19T07:00:04+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election : मागील काही निवडणुकांमध्ये मनसेला आलेल्या अपयशानंतर पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

Maharashtra Election 2019 : MNS will run by Raj Thackeray magic and party building | Maharashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभांचा करिष्मा आणि पक्षबांधणीवर धावणार मनसेचं इंजिन

Maharashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभांचा करिष्मा आणि पक्षबांधणीवर धावणार मनसेचं इंजिन

Next
ठळक मुद्देनागरिकांची केलेल्या कामांचा होईल फायदामनसेचे एकेकाळी पुण्यात 29 नगरसेवक आले होते निवडून; परंतू, ही संख्या एकदम दोनवर

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच जागा लढविण्यात येत आहेत. पक्षाला मागील काही निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशानंतर पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मागील दोन-अडीच वर्षात बांधलेली पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक पातळीवर नागरिकांची केलेली कामे यामुळे निवडणुकीमध्ये चांगला फायदा होईल, असे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.
मनसेचे एकेकाळी पुण्यात 29 नगरसेवक निवडून आले होते. परंतू, ही संख्या एकदम दोनवर आली. तरीही पक्ष नेते आणि कार्यकर्ते निराश होऊन बसले नाहीत. सातत्याने पक्षबांधणीवर भर देण्यात आला. त्यासाठी शाखा स्तरापासून विभागापर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण करण्यात आली. संपर्काचे जाळे निर्माण करण्यात आले. शहरप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी आहे. पक्ष वाढीसाठी एक मतदार संघ आठवड्याचा एक दिवस याप्रमाणे नियोजन केले होते. त्यातूनही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढला. 
या निवडणुकीमध्ये पक्ष नेते बाबू वागस्कर, रणजित शिरोळे, बाळा शेडगे, गणेश सातपुते यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नियोजनाची जबाबदारी स्विकारलेली आहे. त्यांनी विभागून घेतलेल्या जबाबदारीमुळे प्रचार यंत्रणा सुरळीत सुरु आहे. सर्व मतदार संघांमधील प्रचाराचे नियोजन करण्यात आलेले आहे. दररोज रात्री सर्व पदाधिकारी आणि उमेदवार यांची एकत्र समन्वय बैठक होते. या बैठकीमध्ये दिवसभरातील कामकाज, प्रचार यंत्रणा आणि नियोजनासंदर्भात झालेल्या चर्चेनुसार दुसºया दिवशीचे नियोजन केले जाते. त्याचाही चांगला फायदा या निवडणुकीमध्ये झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
याबाबत अधिक माहिती देताना शिंदे म्हणाले, नागरिकांशी थेट बोलणी आणि भेटी-गाठी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार, छोट्या पदयात्रा, रॅली असे प्रचाराचे स्वरुप आहे. प्रचाराची प्रमुख भिस्त ही राजसाहेब ठाकरे यांच्यावर आहे. त्यांच्या सभांचा पुण्यामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. त्यांना माननारा एक वर्ग असून मनसेचा हक्काचा मतदार सुद्धा आहे. त्यांनी शहरामध्ये तीन सभा दिल्या असून कसबा, कोथरुड आणि हडपसरमध्ये या सभा झाल्या आहेत. पुण्यात मनसेमुळे परिवर्तन झाल्याचे पहायला मिळेल. 
स्थानिक पातळीवर मनसेचे कार्यकर्ते नागरिकांची सर्व प्रकारची कामे करतात. त्यामुळे बराचसा फरक पडत आहे. पक्ष उभा करत असतानाच कार्यकर्ताही उभा राहात आहे. पक्षाची बांधणी लाटेवर होत नसल्याने या बांधणीसाठी वेळ जातो. मागील काही वर्षात मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ पुण्यातील यशाच्या रुपाने दिसणार असल्याचे शिंदे म्हणाले. 

Web Title: Maharashtra Election 2019 : MNS will run by Raj Thackeray magic and party building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.