Maharashtra Budget 2026: अखेर बारामती विमानतळावर आता होणार 'नाइट लँडिंग'ची सोय; राज्याच्या अर्थंसंकल्पात केली तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:37 IST2026-03-06T19:37:05+5:302026-03-06T19:37:14+5:30

Maharashtra Budget 2026 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा याच विमानतळावर विमान उतरताना अपघात झाला, विमान अपघातानंतरच या विमानतळाची असुरक्षितता अधोरेखित करणाऱ्या विविध त्रुटी पुढे आल्या आहेत

Maharashtra Budget 2026 Finally, there will be a facility for 'night landing' at Baramati airport; Provision made in the state's budget resolution | Maharashtra Budget 2026: अखेर बारामती विमानतळावर आता होणार 'नाइट लँडिंग'ची सोय; राज्याच्या अर्थंसंकल्पात केली तरतूद

Maharashtra Budget 2026: अखेर बारामती विमानतळावर आता होणार 'नाइट लँडिंग'ची सोय; राज्याच्या अर्थंसंकल्पात केली तरतूद

बारामती: बारामतीविमानतळावर नाईट लँडिंगसाठी सोयीसुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बारामती विमानतळावर नाईट लँडिंगची सोय केली जाणार असल्याचे अनेक कार्यक्रमांमधून यापुर्वी अनेकदा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने आता शासनाकडून हालचाली सुरू होत्या. अखेर आजच्या अर्थसंकल्पात यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शुक्रवारी राज्य शासनाच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात बारामतीसह लातूर, अमरावती,यवतमाळ येथे नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. बारामती एमआयडीसीतील विमानतळ रिलायन्सकडून राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आले आहे. आजच्या निर्णयामुळे नाइट लैंडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा देण्यासाठी पहिले पाऊल पडले आहे.

बारामती हे विकासाचे रोल मॉडेल म्हणून ओळखले जाते. मात्र येथील उद्योगांना अनुकुल वातावणाची, आवश्यक सोयीसुविधांची कमतरता आहे. या पार्श्वभुमीवर बारामती शहरातील जनसन्मान यात्रेत दिवंगत उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष घालत बारामती येथे विमानाच्या नाइट लँडिंगची घोषणा केली होती. त्यादृष्टीने त्यांनी विविध कामांची आखणी करीत विमानतळ राज्य शासनाकडे घेतले होते. यासाठी आवश्यक निधीची आता तरतुद करण्यात आल्याने विमानतळाचा कायापालट होणार आहे. तसेच विमानतळ विकासाला चालना मिळणार आहे. परिणामी या परिसरात विमानाची नाइट लँडिंगची सोय उपलब्ध झाल्याने नव्याने उद्योजकांचा परिसरात राबता वाढणार आहे. बारामती शहरात पालखी महामार्गासह विविध महामार्ग विकसित झाले आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या नकाशावर बारामतीची ओळख वाढण्यास मदत होणार आहे.

देशात प्रवास अधिक सोयीचा होईल

औद्योगिक विकासासाठी दळणवळण विशेषतः विमानसेवेची मोठी गरज आहे. ही सोय झाल्यास कोणताही उद्योजक परिसरात उद्योग उभारताना 'एअर कनेक्टिव्हिटी' पाहतो; कारण उद्योजकांना वेळ कमी असतो. बारामतीत उद्योजकांना सोयीस्कर होण्यासाठी विमानतळ वाहतूक महत्त्वाची आहे. विमानाची 'हॉपिंग' सर्विस असते. नाइट लँडींगमुळे हि सर्व्हिस बारामतीत सुरु होण्याची संधी आहे. रात्रीच्या वेळी विमाने उतरण्यास सुविधा निर्माण झाल्यास बारामतीमध्ये कारखानदारी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे साहजिकच या परिसरामध्ये गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मिती आणखी वाढेल. तसेच कारखानदारीला चालना मिळून रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा याच विमानतळावर विमान उतरताना अपघात झाला. त्यानंतर हे विमानतळ संपुर्ण देशभरात चर्चेत आले. विमान अपघातानंतरच या विमानतळाची असुरक्षितता अधोरेखित करणाऱ्या विविध त्रुटी पुढे आल्या. आता नाइट लॅंडिंग सुविधेबरोबरच या त्रुटी दुर होण्यास मदत होणार आहे. मात्र,बारामतीकरांपासुन त्यांच्या लाडक्या नेत्याला हिरावणारा याच विमानतळावरील अपघात बारामतीकरांच्या मनात कायम घर करुन आहे, कायम स्मरणात आहे.

Web Title : बारामती हवाई अड्डे पर नाईट लैंडिंग सुविधा: बजट में प्रावधान

Web Summary : बारामती हवाई अड्डे पर जल्द ही नाईट लैंडिंग! राज्य के बजट में बारामती, लातूर, अमरावती और यवतमाल में नाईट लैंडिंग सुविधाओं के लिए धन आवंटित किया गया है। इससे औद्योगिक विकास और कनेक्टिविटी को बढ़ावा मिलेगा, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार का वादा पूरा होगा।

Web Title : Baramati Airport to Get Night Landing Facility: Budget Provision Made

Web Summary : Baramati airport will soon have night landing! The state budget allocates funds for night landing facilities in Baramati, Latur, Amravati and Yavatmal. This will boost industrial development and connectivity, fulfilling a promise made by the late Deputy Chief Minister Ajit Pawar.