Pune: खडकवासला धरणाकडे फिरायला जाऊ म्हणून लॉजवर नेऊन केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 11:47 IST2023-10-14T11:46:37+5:302023-10-14T11:47:22+5:30

याप्रकरणी २५ वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Khadakwas was taken to the lodge to go for a walk to the dam and raped | Pune: खडकवासला धरणाकडे फिरायला जाऊ म्हणून लॉजवर नेऊन केला बलात्कार

Pune: खडकवासला धरणाकडे फिरायला जाऊ म्हणून लॉजवर नेऊन केला बलात्कार

पुणे :खडकवासला येथे फिरायला जाऊ असे सांगत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला नांदेड सिटी परिसरातील एका लॉजवर नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र, घटना सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा सिंहगड रोड पोलिसांकडे वर्ग केला आहे.

सिंहगड रोड पोलिसांनी आशिष राजेंद्र ताकतोडे (२५, रा. सिंहगड रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या १६ वर्षीय मुलीसोबत ओळख वाढवली. सप्टेंबर २०२२ मध्ये आशिष तिला खडकवासला येथे फिरण्यास जाऊ, असे सांगून नांदेड सिटी परिसरातील एका लॉजवर घेऊन जाऊन अत्याचार केले. तसेच लग्न केले नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार समजताच फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत.

Web Title: Khadakwas was taken to the lodge to go for a walk to the dam and raped