Pune Lok Sabha Result 2024:‘गड आला; पण सिंह गेला’; धंगेकरांचा पराभव, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना

By प्रशांत बिडवे | Published: June 4, 2024 07:15 PM2024-06-04T19:15:35+5:302024-06-04T19:17:45+5:30

Pune Lok Sabha Result 2024: भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांचा शानदार विजय, मात्र पुण्याच्या लढतीत पराभव

kasba vidhansabha election winner ravindra dhangekar losses in Pune Lok Sabha Result 2024 | Pune Lok Sabha Result 2024:‘गड आला; पण सिंह गेला’; धंगेकरांचा पराभव, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना

Pune Lok Sabha Result 2024:‘गड आला; पण सिंह गेला’; धंगेकरांचा पराभव, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना

Pune Lok Sabha Result 2024 : एकीकडे पुण्यात रवींद्र धंगेकर  (Ravindra Dhangekar) यांचा पराभव झाला आणि अपेक्षित निकाल न लागल्याने कार्यकर्ते निराश होते. मात्र, महाराष्ट्र आणि केंद्रात इंडिया आघाडीने चांगल्या जागा मिळविल्याने काँग्रेस कार्यालयात समाधानाचे वातावरण होते. नुकताच भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी शानदार विजय मिळविल्यामुळे धंगेकर विरुद्ध मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या लढतीला महत्त्व प्राप्त झाले होते. स्वतः राहुल गांधी यांनी सभा घेतली होती आणि पुणेकरही धंगेकर यांना निवडून देतील, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुण्यात धंगेकर पराभूत झाले आणि इंडिया आघाडीने मात्र, राज्य आणि देशात चांगली कामगिरी केली. त्यामुळे ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेस उमेदवार विजयी घोषित करताच टाळ्यांचा कडकडाट

कर्नाटकातील हसन मतदारसंघात प्रज्वल रेवण्णा पराभूत झाल्याचे समजताच भवनातील कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. राज्यात वर्षा गायकवाड आणि ॲड. उज्ज्वल निकम, सोलापूर येथे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेल्या लढतीवर काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष ठेवून होते. अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड विजयी होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली.

Web Title: kasba vidhansabha election winner ravindra dhangekar losses in Pune Lok Sabha Result 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.