...अखेर पुण्याच्या काँग्रेसमधून हटवला 'त्या' नेत्याचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:35 IST2019-09-19T18:31:38+5:302019-09-19T18:35:21+5:30
पुण्यातील काँग्रेस भवनमधून काढणे बाकी होते. अखेर फोटो व्हायरल होऊ नये म्हणून त्वरित फोटो झाकण्यात आला. सुरुवातीला फोटोवर फुली मारून तो झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही उद्देश सफल न झाल्याने अखेर फोटो तात्पुरता कागद लावण्यात आला.

...अखेर पुण्याच्या काँग्रेसमधून हटवला 'त्या' नेत्याचा फोटो
पुणे : पक्ष सोडल्यावरही पोस्टरवर विराजमान असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा फोटो काँग्रेस भवन यांचा फोटो कार्यकर्त्यांनी हटवला. खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या पत्रकार परिषदेच्या आधी घाईघाईने कार्यकर्त्यांनी ही कृती केली.
इंदापूरच्या जागेविषयी समाधानकारक निर्णय न झाल्याने काँग्रेसमध्ये असणारे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या नेत्यांचे छायाचित्र फलकावरून काढून टाकले जात आहे. त्यात पाटील यांचा फोटो पुण्यातील काँग्रेस भवनमधून काढणे बाकी होते. अखेर फोटो व्हायरल होऊ नये म्हणून त्वरित फोटो झाकण्यात आला. सुरुवातीला फोटोवर फुली मारून तो झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही उद्देश सफल न झाल्याने अखेर फोटो तात्पुरता कागद लावण्यात आला.
काही दिवसांपूर्वी पाटील यांनी इंदापूर येथे जाहीर मेळावा घेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नुकतीच पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महाजनादेश यात्रेतही पाटील सहभागी झाल्याचे दिसले होते.