Pune | खेड-शिवापूर टोल नाक्यावर आठ किलो गांजा जप्त; पाच जणांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:09 PM2023-01-17T12:09:15+5:302023-01-17T12:10:54+5:30

कारच्या मागील डिकीत गांजाने भरलेल्या पिशव्या आढळून आल्या...

Eight kg ganja seized at Khedshiwapur toll booth; Five people were taken into custody | Pune | खेड-शिवापूर टोल नाक्यावर आठ किलो गांजा जप्त; पाच जणांना घेतले ताब्यात

Pune | खेड-शिवापूर टोल नाक्यावर आठ किलो गांजा जप्त; पाच जणांना घेतले ताब्यात

googlenewsNext

खेडशिवापूर (पुणे) : खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी आठ किलो गांजा व पाच जणांना ताब्यात घेतले. पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका येथे पुणे बाजाकडून सातारकडे जाणारी कार (एचआर ५१ बी. सी. २४२४) राजगड पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी तपासणीसाठी थांबविली असता, मागील डिकीत गांजाने भरलेल्या पिशव्या आढळून आल्या. गांजा व पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

खेड-शिवापूर टोलनाका येथे सोमवार (दि. १६) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गांजा असलेल्या कारने प्रवास करणारे आरोपी ईस्माईल बाबू सय्यद, सैफाली शब्बीर सुतार, जैनुल गजबार मुल्ला, जिआउल रेहमान रियाज मुजावर, आजू अजगर अल्ली खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Eight kg ganja seized at Khedshiwapur toll booth; Five people were taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.