Kasba By Election | कसब्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले : रविंद्र धंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:18 IST2023-02-28T10:17:06+5:302023-02-28T10:18:23+5:30
निवडणूक यंत्रणा ही भाजपचं कार्यालय झालं आहे, असा आरोप पत्रकारांशी बाेलताना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे....

Kasba By Election | कसब्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले : रविंद्र धंगेकर
पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ८ वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही पोलिसांच्या उपस्थितीत फिरत होते. माझ्यावर गुन्हा दाखल केला, मग त्यांच्यावरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा हा पक्षपातीपणा का करायला हवा. मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं आहे. पण, निवडणूक यंत्रणा ही भाजपचं कार्यालय झालं आहे, असा आरोप पत्रकारांशी बाेलताना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारासोबत आर्थिक प्रचारही मोठा झाला आहे. भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यावर मतदानादिवशी पैसे वाटल्याच्या आरोपाखाली गुन्हाही दाखल झाला आहे. काँग्रेसकडूनही या निवडणुकीत पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक झाली.