पुण्यात न्यायालयातच पुरविला गांजा; दोघांवरही गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 13:05 IST2022-06-11T13:02:06+5:302022-06-11T13:05:22+5:30
गांजा देणाऱ्या साथीदारावर गुन्हा दाखल...

पुण्यात न्यायालयातच पुरविला गांजा; दोघांवरही गुन्हा दाखल
पुणे : मोक्कातील आरोपीला अटक करून, शिवाजीनगरन्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या एका साथीदाराने त्याला तेथेच गांजा दिल्याचा प्रकार पोलिसांच्या झाडाझडतीमधून समोर आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोक्कातील आरोपी मेहबूब जब्बार पठाण (२५, रा.स्वारगेट) याच्यासह त्याला गांजा देणाऱ्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पठाण याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात मोक्काचा गुन्हा दाखल आहे. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, साथीदाराने तेथेच गांजाची पुडी दिली. पोलिसांनी पठाणची झाडाझडती घेतल्यानंतर एक ग्रॅम गांजा सापडला. शिवाजीनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी ही माहिती दिली.