दोन डोस घेऊनही भीमराव तापकीर यांना कोरोनाची लागण; पावसाळी अधिवेशनही हुकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 11:43 IST2021-07-05T11:42:57+5:302021-07-05T11:43:03+5:30
घरीच अलगीकरण करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे समजते.

दोन डोस घेऊनही भीमराव तापकीर यांना कोरोनाची लागण; पावसाळी अधिवेशनही हुकले
धायरी: खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे समजते.
तापकीर यांनी यापूर्वी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र तरीही त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज, ५ जुलै आणि उद्या, ६ जुलै अशा दोन दिवसांत हे अधिवेशन पार पडणार आहे. मात्र तापकीर यांना कोरोना झाल्याने ते पावसाळी अधिवेशनाला जाऊ शकणार नाहीत.