केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:43 IST2024-11-16T16:35:35+5:302024-11-16T16:43:06+5:30

सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुरलीधर मोहोळ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत

Bag inspection of Union Minister of State Muralidhar Mohol | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची तपासणी

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची तपासणी

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची सोलापूर येथे निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुरलीधर मोहोळ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. 

विमानतळावर उतरल्यानंतर निवडणूक आयोगाने मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगा तपासल्या. यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तपासणी करताना मुरलीधर मोहोळ यांनी सहकार्य केले.

राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच बॅगा तपासणीच्या मुद्द्याने राज्याच्या राजकारणात चांगलाच जोर पकडल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Bag inspection of Union Minister of State Muralidhar Mohol