शिरूरमधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल, महायुतीच्या आढळरावांशी लढत
By नितीन चौधरी | Updated: April 18, 2024 12:35 IST2024-04-18T12:33:31+5:302024-04-18T12:35:43+5:30
पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून अमोल कोल्हे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे....

शिरूरमधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल, महायुतीच्या आढळरावांशी लढत
पुणे :पुणे मावळ व शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून अमोल कोल्हे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार व बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, अशोक पवार, संजय जगताप, सचिन अहिर, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. कोल्हे यांनी आपला अर्ज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे सुपूर्द केला.