किल्ले राजगडावरुन पडून 19 वर्षीय तरुणाचा मुत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 18:47 IST2021-02-14T18:46:39+5:302021-02-14T18:47:34+5:30
किल्ले राजगडावरील पद्मावती माचीवरील गुंजवण्याच्या बाजुने सकाळी सातच्या दरम्यान सुर्यादयाच्यावेळी सेल्फी काढत असताना हातातील पॅावर बॅंक खाली पडली असता ती पॅावर बॅंक काढण्यासाठी गेला

किल्ले राजगडावरुन पडून 19 वर्षीय तरुणाचा मुत्यू
पुणे - वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडावरुन एका १९ वर्षीय तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यु झाल्याची माहिती वेल्हे पोलीसांनी दिली. याबाबत वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, किल्ले राजगडावर १६ लोकांचा एक ग्रुप आला होता. त्यामधील अनुराग अनिल राक्षेर (वय १९) राहणार, भायखळा मुंबई या युवकाचा दरीत कोसळुन जागीच मुत्यु झाला आहे.
किल्ले राजगडावरील पद्मावती माचीवरील गुंजवण्याच्या बाजुने सकाळी सातच्या दरम्यान सुर्यादयाच्यावेळी सेल्फी काढत असताना हातातील पॅावर बॅंक खाली पडली असता ती पॅावर बॅंक काढण्यासाठी गेला, त्यावेळी तोल जाऊन हा तरुण किल्ल्याच्या तटावरुन खाली कोसळला. साधारण एक हजार फुट खोल दरीत हा युवक कोसळल्याने त्याचा जागीच मुत्यु झाला. या मृत तरुणास बाळु पवार, अनिल फणसे, गोविंद रसाळ, पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ, पोलीस जवान अभय साळुंखे, औंदुबर आडवाल आदींनी बाहेर काढून किल्ल्याच्या पायथ्याशी गुंजवणे येथे आणले. पोलिसांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविला. याप्रकरणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंदुंबर आडवाल अभय साळुंखे अधिक तपास करीत आहेत.