"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:27 IST2024-10-24T21:26:47+5:302024-10-24T21:27:31+5:30
suhas kande chhagan Bhujbal : समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केल्याने महायुतीत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना लक्ष्य केले.

"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
Suhas Kande News: नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. २८ ऑक्टोबर रोजी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. समीर भुजबळ यांनी घोषणा केल्यानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांवरच निशाणा साधला. भुजबळ गद्दार आहेत, त्यांचा गद्दारीचाच इतिहास आहे, अशी टीका सुहास कांदेंनी केली.
सुहास कांदेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच शिंदे-फडणवीसांनी परवानगी दिली, तर येवल्यातून निवडणूक लढवणार, अशी भूमिका त्यांनी मांडली.
छगन भुजबळांचा गद्दारीचा इतिहास
सुहास कांदे म्हणाले, "भुजबळांसाठी गद्दारी नवीन नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत गद्दारी केली. शरद पवारांसोबत गद्दारी केली. आता महायुतीसोबत गद्दारी केली. गद्दारी हा शब्द भुजबळांसाठी नवा नाही, असे मला वाटते."
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा आहे. जन्माला आले... मला वाटतं आईबापासोबतही गद्दारी केली असेल. ज्यांनी लहानच मोठं केलं राजकारणात, बाळासाहेब. त्यांना टी बाळू म्हणाले. त्यांना शिव्या दिल्या. त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी मोठं मोठ्या संस्था दिल्या. त्यांच्याविरोधात गद्दारी केली. सकाळी जाऊन त्यांना भेटले. मी फक्त जाऊन येतो म्हणाले आणि पक्षात प्रवेश केला. ज्या व्यक्तीचा इतिहास गद्दारीचा आहे, ज्या कुटुंबाचा इतिहास गद्दारीचा आहे, त्यावर काय भाष्य करायचं?", असा खोचक टोला आमदार सुहास कांदेंनी लगावला.