On Radhakrishna Vikhe Sen's platform | राधाकृष्ण विखे सेनेच्या व्यासपीठावर

राधाकृष्ण विखे सेनेच्या व्यासपीठावर

अहमदनगर : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत हजेरी लावली. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला आहे, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी शिर्डीत जाहीर केले. शुक्रवारी विखे यांनी साकुरी येथे खा. लोखंडे यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली. विखे यांनी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीचे कौतुक केले. संगमनेर येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेकडे मात्र विखे यांनी पाठ फिरवली. श्रीरामपूरमध्ये झालेल्या सभेत डॉ. सुजय यांनी वडिलांनाही लवकरच भाजपमध्ये आणू, असे वक्तव्य केले.

आज भूमिका स्पष्ट करणार
राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी दुपारी बारा वाजता लोणीत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विखे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. ते काँग्रेसमध्येच असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर विखे थेट सेनेच्या व्यासपीठावर गेल्याने त्यांना काँग्रेसने नोटीस दिल्याचीही माहिती आहे.

Web Title: On Radhakrishna Vikhe Sen's platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.