पदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करु नये - राधाकृष्ण विखे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:23 AM2019-04-15T06:23:07+5:302019-04-15T06:24:18+5:30

विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये.

Do not worry about me sitting in the water for God - Radhakrishna Vikare | पदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करु नये - राधाकृष्ण विखे

पदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करु नये - राधाकृष्ण विखे

Next

लोणी (जि.अहमदनगर): विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये. पद मिळण्यासाठी तेवढे कष्ट घ्यावे लागतात. मागील साडेचार वर्षात हे एक तरी शब्द सरकारच्या विरोधात बोलले का? त्याला हिंमत लागते. माझे काय व्हायचे याची चिंता करण्यासाठी प्रवरा परिसरातील प्रत्येक माणूस सक्षम आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली.
पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाच्या सांगता कार्यक्रमात रविवारी विखे बोलत होते.
ते म्हणाले, तुमच्या चिंता भविष्यात कशा वाढतील ते पहा. आम्ही दक्षिणेत गेल्यामुळे काहींना मोकळे रान मिळाले आहे. पण २३ तारखेनंतर आमची ताकद काय आहे हे दाखवून देऊ. उसाचे वजन झाल्यानंतर एसएमएसद्वारे आपल्या उसाच्या वजनाची माहिती सभासदाला देणारा प्रवरा हा एकमेव कारखाना असून हे मात्र संगमनेरला का होत नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. मध्यंतरी साखरेच्या भावाचे प्रश्न होते.
उशीर झाला तरी प्रवरेच्या कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडाले नाहीत. मात्र दूध डेअरी बंद पाडणारांनी त्या कामगार आणि शेतकऱ्यांचा कधी विचार केला का? असा सवाल राधाकृष्ण विखे यांनी यावेळी केला.
>जनता सगळे जाणते - थोरात
विरोधी पक्षनेते म्हणून विखे यांनी कसे काम केले हे महाराष्टÑ जाणतो. माध्यमे आणि राजकीय विश्लेषकांनी त्यावर वेळोवेळी भाष्य केले आहे. कॉंग्रेस पक्ष कुणी वाढविला व कुणी सोडला हे सर्वांना माहित आहे. विनाकारण मला यावर बोलायला लावू नका. विधानसभेतील व विधानसभेबाहेरीलही माझी व त्यांची भाषणे यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. ती भाषणे जरी पाहिली तरी कोण सरकारच्या प्रेमात होते व कोण विरोधात होते हे लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी विखे यांच्या वक्तव्याबाबत व्यक्त केली आहे.
>एकटा सुजयच पुरेसा...
राज्यात ४८ मतदारसंघ असताना केवळ नगरचीच सर्वाधिक चर्चा होते. नगरची चिंता करणाºया पुढाºयांसाठी एकटा सुजय विखेच पुरेसा आहे. सर्वसामान्य माणसाच्या विकासाचे काम करीत असल्यामुळेच जनता डॉ.सुजयच्या पाठिशी असल्याचा दावाही विखे यांनी केला.

Web Title: Do not worry about me sitting in the water for God - Radhakrishna Vikare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.