जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:02 IST2019-04-21T05:02:13+5:302019-04-21T05:02:49+5:30
महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : लोकसभा निवडणुकीसाठी ५६ पक्ष एकत्रितपणे हातात हात घालून फोटोसेशन करीत असले तरी त्यांचे पायात पाय आहेत, हे जनतेने ओळखावे. अशा खेकड्याच्या प्रवृत्ती लोकसभेत पाठविण्यापेक्षा सीमेवरील जवानांना हिंमत देणारे देशहितासाठी झटणारे सरकार निवडा. महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
इचलकरंजी येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि गडहिंग्लज येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सभा झाल्या.
ठाकरे म्हणाले, ज्या-ज्या वेळी देशाला काय करायचे, असा प्रश्न पडतो, त्यावेळी महाराष्टÑ पुढे येऊन नेतृत्व करतो आणि देशाला दिशा दाखवितो, याचा आपल्याला अभिमान पाहिजे.
इचलकरंजी मॅँचेस्टरनगरी आहे. येथील वस्त्रोद्योगासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वस्त्रोद्योग दिमाखदारपणे उभा करूया. त्यासाठी तुम्ही धैर्यशीलला ताकद द्या. आम्ही व संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि या उद्योगाचे प्रश्न सोडवेल. शिवसेनेने उद्योग वाढीसाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
शेतकऱ्यांच्या पाठीशीही शिवसेना नेहमीच राहते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच राहिली आहे. लग्नासाठी कर्जबाजारी होणाºया अनेक शेतकºयांच्या मुला-मुलींचे सामूहिक विवाह शिवसेनेने लावून दिले. त्याचबरोबर यावेळी कर्जमाफी दिली, भविष्यात कर्जमुक्तही करू, असेही ठाकरे म्हणाले.