प्रज्ञासिंहऐवजी भाजप देणार नवा उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 06:34 IST2019-04-24T06:34:18+5:302019-04-24T06:34:59+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजपने त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा विचार सुरू केल्याची इथे जोरदार चर्चा आहे.

BJP's new candidate instead of Pragya Singh? | प्रज्ञासिंहऐवजी भाजप देणार नवा उमेदवार?

प्रज्ञासिंहऐवजी भाजप देणार नवा उमेदवार?

भोपाळ : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजपने त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा विचार सुरू केल्याची इथे जोरदार चर्चा आहे. भाजपचे विद्यमान खासदार आलोक संजर यांनी मंगळवारी आपला अर्ज सादर केल्याने या चर्चेला ऊत आला आहे. निवडणूक आयोगाने प्रज्ञा सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्याने भाजप नेते अडचणीत आले आहेत. मात्र प्रज्ञा सिंह यांनी आपला दुसरा उमेदवारी अर्जही आज सादर केला. त्यावेळी भाजपचा एकही नेता त्यांच्याबरोबर नव्हता. (वृत्तसंस्था)
 

Web Title: BJP's new candidate instead of Pragya Singh?