Municipal Election : भाजप उमेदवारांसाठी ‘ईव्हीएम’मध्ये दोन ते अडीच हजार मते सेट; राष्ट्रवादी (अजित पवार)चा भाजपवर पलटवार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:45 IST2025-12-28T15:45:21+5:302025-12-28T15:45:30+5:30

- नगरसेवक निवडून येतील, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार)चे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पलटवार केला

Two to two and a half thousand votes set in EVMs for BJP candidates; Nationalist Congress Party (Ajit Pawar) counterattacks BJP | Municipal Election : भाजप उमेदवारांसाठी ‘ईव्हीएम’मध्ये दोन ते अडीच हजार मते सेट; राष्ट्रवादी (अजित पवार)चा भाजपवर पलटवार  

Municipal Election : भाजप उमेदवारांसाठी ‘ईव्हीएम’मध्ये दोन ते अडीच हजार मते सेट; राष्ट्रवादी (अजित पवार)चा भाजपवर पलटवार  

पिंपरी : महापालिकेत १२८ जागांपैकी १२५ जागांवर नगरसेवक निवडून येतील, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार)चे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पलटवार केला आहे.

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेताना मतदान यंत्रात (ईव्हीएम) दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, असे भाजपकडून सांगितले जात असल्याचा आरोप त्यांनी शनिवारी (दि. २७) केला. भाजपसोबत राज्यातील सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने असा गंभीर आरोप केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढत आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये माजी नगरसेवकांच्या फोडाफोडीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

बहल म्हणाले की, शहरात भाजपचे विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे चार आमदार आहेत. प्रत्येक आमदार २५ नगरसेवक निवडून आणेल असे भाजप नेतृत्वाला वाटत असेल. त्यामुळे शंभरपारचा नारा दिला जात आहे. त्याला आमची हरकत नाही.

आता भाजपने १२८ पैकी १२५ नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. त्यांनी ईव्हीएम सेट केले आहे का, हे त्यांनाच माहीत! मात्र, पक्षात घेणाऱ्या माजी नगरसेवकांना मतदान यंत्रामध्ये दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, तुम्ही आमच्याकडे या, बाकीची सर्व मदत करतो, असे आश्वासन भाजप नेत्यांकडून दिले जात आहे.

...तर मी कायमचे राजकारण सोडेन

बहल म्हणाले की, शहरातील ३२ पैकी सात ते दहा प्रभागांमध्ये भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. राष्ट्रवादी (अजित पवार)चे दहा माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने त्यांच्याकडून डोळे झाकून १२५ जागा निवडून येतील, असा दावा केला जात आहे. मात्र, भाजपला अतिआत्मविश्वास, घमेंड आहे. शंभर जागा मिळविणेही भाजपसाठी कठीण आहे. भाजपच्या १२५ जागा आल्या, तर मी कायमचे राजकारण सोडेन.

Web Title: Two to two and a half thousand votes set in EVMs for BJP candidates; Nationalist Congress Party (Ajit Pawar) counterattacks BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.