PCMC Election 2026: त्यांच्या हातात सत्ता गेली तर शहराचा खेळखंडोबा; आपल्याला भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:35 IST2026-01-07T13:33:45+5:302026-01-07T13:35:27+5:30

PCMC Election 2026 ग्रीन बॉण्ड नावाखाली २०० कोटींचे कर्जरोखे काढले आहेत, त्यांनी लोकांची घरेदारे पाडली, रस्त्यावर आणले.

PCMC Election 2026 If power falls into their hands, the city will be a mess; We have to eliminate the 'master' of corrupt people - Ajit Pawar | PCMC Election 2026: त्यांच्या हातात सत्ता गेली तर शहराचा खेळखंडोबा; आपल्याला भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा - अजित पवार

PCMC Election 2026: त्यांच्या हातात सत्ता गेली तर शहराचा खेळखंडोबा; आपल्याला भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा - अजित पवार

पिंपरी: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शहरातील समस्यांवर भाष्य केलं आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत शहरातील भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा असल्याचे नागरिकांना आश्वासन दिले आहे. 

अजित पवार म्हणाले, ग्रीन बॉण्ड नावाखाली २०० कोटींचे कर्जरोखे काढले आहेत. यांनी लोकांची घरेदारे पाडली. त्यांना रस्त्यावर आणले. यांच्या हातात सत्ता गेली तर परत शहराचा हे खेळखंडोबा करतील. अनधिकृत घरांमध्ये राहणारे नागरिक आपलेच आहेत. प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आज एका मंत्र्याने याच ठिकाणी सांगितले. मात्र, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय मीच मार्गी लावू शकतो. आपल्याला भ्रष्टाचारासोबत त्यांच्या ‘आका’लाही संपवायचे आहे.

२०१७ पर्यंत आम्ही सर्व कारभार पाहत असताना ज्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या; त्या सर्व सुविधा आम्ही तुम्हाला पुन्हा उपलब्ध करून देऊ. मुबलक पाणीपुरवठा, चांगले रस्ते, स्वच्छ परिसर यांसारख्या सर्व सुविधा पुन्हा तुमच्या दारापाशी आणू.  त्याकरता येत्या १५ जानेवारीला आमच्या सर्व उमेदवारांना मतांच्या रूपानं तुम्ही आशीर्वाद द्या असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं आहे, 

मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले

महापालिकेतील सत्ताधारी कोणाला ठेकेदारीचे काम द्यायचे ते ठरवतात. नाही ऐकले तर काम देत नाहीत. कारभारी बदलले पाहिजेत. त्यांना सत्तेची गुर्मी आली आहे. पैशाचा माज आला आहे. त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आलो आहोत. मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता एकत्रित काम करुया असेही पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

Web Title : पीसीएमसी चुनाव में सत्ता मिली तो भ्रष्टाचार खत्म करेंगे: अजित पवार

Web Summary : अजित पवार ने पीसीएमसी चुनाव 2026 में एनसीपी की सत्ता आने पर पिंपरी-चिंचवड में भ्रष्टाचार खत्म करने का वादा किया। उन्होंने मौजूदा प्रशासन की वित्तीय कुप्रबंधन और बुनियादी सुविधाओं की उपेक्षा के लिए आलोचना की। बेहतर सुविधाएं और संपत्ति कार्ड मुद्दे हल करने का आश्वासन दिया।

Web Title : Ajit Pawar vows to end corruption if PCMC power shifts.

Web Summary : Ajit Pawar promises to end corruption in Pimpri-Chinchwad if NCP gains power in PCMC 2026 elections. He criticized the current administration for financial mismanagement and neglecting basic amenities. He assures better facilities and resolving property card issues.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.