PCMC Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादीच्या एक तर उद्धवसेनेच्या सर्वांचे डिपॉझिट जप्त; भाजपच्या एकही नाही, एकूण संख्या ४२३

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 20:21 IST2026-01-21T20:21:18+5:302026-01-21T20:21:30+5:30

PCMC Election 2026 काँग्रेसच्या ४७ उमेदवारांपैकी फक्त एका उमेदवाराचे डिपॉझिट वाचले, तर ४६ उमेदवारांना अपयश आले

PCMC Election 2026 Deposits of all NCP and Uddhav Sena members seized in Pimpri; none of BJP, total number 423 | PCMC Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादीच्या एक तर उद्धवसेनेच्या सर्वांचे डिपॉझिट जप्त; भाजपच्या एकही नाही, एकूण संख्या ४२३

PCMC Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादीच्या एक तर उद्धवसेनेच्या सर्वांचे डिपॉझिट जप्त; भाजपच्या एकही नाही, एकूण संख्या ४२३

पिंपरी : महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी उतरलेल्या एकूण ६९२ उमेदवारांपैकी तब्बल ६१ टक्के, म्हणजे ४२३ उमेदवारांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे. केवळ २६९ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश आले. निवडणुकीत अनेक पक्षांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. शहरात भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने उभे केलेल्या १२३ पैकी एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) यांनीही प्रभावी कामगिरी करत १२० पैकी ११९ उमेदवारांचे डिपॉझिट वाचवले, तर केवळ एका उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले.

उद्धवसेनेच्या सर्वांना धक्का, काँग्रेसच्या केवळ एकाचे वाचले डिपॉझिट

शिंदेसेनेने ५८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १४ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले, तर ४३ उमेदवारांचे जप्त झाले. दुसरीकडे, उद्धवसेना आणि काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत निराशाजनक ठरली. उद्धवसेनेच्या ४७ पैकी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. काँग्रेसच्या ४७ उमेदवारांपैकी फक्त एका उमेदवाराचे डिपॉझिट वाचले, तर ४६ उमेदवारांना अपयश आले.

राष्ट्रवादी (शरद पवार) चे पाच जण, तर सहा अपक्ष बचावले

राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या ११ उमेदवारांपैकी पाच जणांचे डिपॉझिट वाचले, तर सहा जणांचे जप्त झाले. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, बसप आणि सनय छत्रपती शासन या पक्षांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अपक्ष उमेदवारांपैकी केवळ सहा उमेदवारांचे डिपॉझिट वाचले, तर १५९ अपक्षांची अनामत जप्त झाली आहे.

डिपॉझिट जप्त होण्याचे गणित

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही उमेदवाराला त्याचे डिपॉझिट वाचवण्यासाठी मतांचा ठराविक कोटा पार करावा लागतो. प्रभागात पडलेल्या एकूण वैध मतांच्या किमान १/६ (सहावा हिस्सा किंवा एक षष्ठांश) मते मिळवणे अनिवार्य असते. एकूण वैध मतांच्या १६.६६ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली, तर उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

पक्षनिहाय उमेदवार व डिपॉझिट स्थिती 

- भाजप : एकूण १२३, अनामत वाचली १२३, जप्त ०
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : एकूण १२०, अनामत वाचली ११९, जप्त १

- शिंदेसेना : एकूण ५८, अनामत वाचली १४, जप्त ४३
- उद्धवसेना : एकूण ४७, अनामत वाचली ०, जप्त ४७

- काँग्रेस : एकूण ४७, अनामत वाचली १, जप्त ४६
- राष्ट्रवादी (श.प.) : एकूण ११, अनामत वाचली ५, जप्त ६

- वंचित बहुजन आघाडी : एकूण ३६, अनामत वाचली ०, जप्त ३६
- आम आदमी पार्टी : एकूण २९, अनामत वाचली ०, जप्त २९

- बसप : एकूण १६, अनामत वाचली ०, जप्त १६
- मनसे : एकूण १३, अनामत वाचली १, जप्त १२

- सनय छत्रपती शासन : एकूण ७, अनामत वाचली ०, जप्त ७
- पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडी : एकूण ७

- अपक्ष : एकूण १६५, अनामत वाचली ६, जप्त १५९
एकूण : एकूण उमेदवार ६९२, अनामत वाचली २६९, अनामत जप्त ४२३

Web Title : PCMC चुनाव 2026: पिंपरी में NCP जीती, शिवसेना की ज़मानत ज़ब्त

Web Summary : PCMC चुनाव में बीजेपी का दबदबा रहा। उद्धव सेना समेत कई लोगों की ज़मानत ज़ब्त हुई। NCP (अजित पवार) का प्रदर्शन अच्छा रहा। निर्दलीय उम्मीदवारों को काफ़ी संघर्ष करना पड़ा।

Web Title : PCMC Election 2026: NCP wins, Shiv Sena loses deposits in Pimpri

Web Summary : In PCMC election, BJP dominated. Many lost deposits, including Uddhav Sena. NCP (Ajit Pawar) performed well. Independent candidates struggled significantly.