मावळ मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत १३१ तक्रारी दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:33 PM2019-04-15T16:33:12+5:302019-04-15T16:45:20+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत.

131 complaints regarding about code of conduct in Maval constituency | मावळ मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत १३१ तक्रारी दाखल 

मावळ मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत १३१ तक्रारी दाखल 

Next
ठळक मुद्दे यंदा नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रारी नोंदविण्यासाठी अ‍ॅप विकसित

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ प्राप्त तक्रारीपैंकी ७५ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला आहे. तर, ५६ निकाल तक्रारी निकाली काढल्या आहेत. 
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रारी नोंदविण्यासाठी अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी अ‍ॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो 'अपलोड'  करावा लागत आहे. 

पनवेल विधानसभा मतदारसंघामधून ३ , कर्जत १, उरण १५, मावळ ३७ , चिंचवड ७० आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अशा १३१ आचारसंहिता उल्लंघनाच्या  तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैंकी ७५ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला आहे. तर, ५६ निकाल तक्रारी निकाली काढल्या आहेत.
 

Web Title: 131 complaints regarding about code of conduct in Maval constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.