काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:00 AM2021-01-28T06:00:00+5:302021-01-28T06:00:01+5:30

निया शर्माने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले नवीन काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

निया या फोटोंमध्ये खूपच छान दिसत असल्याचे तिचे फॅन्स कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली.

खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचे विजेतेपद नियाने मिळवले होते.

निया सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.

निया तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते.