गंगूबाई बनत लोकप्रिय झालेली सलोनी आता दिसते इतकी ग्लॅमरस, जाणून घ्या ती सध्या काय करतेय !

By सुवर्णा जैन | Published: September 23, 2020 10:56 AM2020-09-23T10:56:19+5:302020-09-23T11:13:43+5:30

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा अभिनेत्रींबाबत पाहायला मिळतं. काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब प्रत्येकाला चांगलीच माहितीय. त्यामुळे प्रत्येक कलाकार लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. सध्याची नव्या कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे बालकलाकार सलोनी डॅनी.

सलोनीने 'गंगूबाई' पात्रच्या माध्यातून रसिकांना खळखळून हसवलं. आपल्या खास विनोदी शैलीच्यातून तिने रसिकांवर मोहिनी घातली होती. तिचं कधी निरागस कधी खोडकर असणं रसिकांना भावलं होतं.

अल्पावधीतच सलोनी सा-यांची आवडती कलाकार बनली होती. 'कॉमेडी सर्कस महासंग्राम'मधून कॉमेडियन म्हणून तिने डेब्यू केला होता आणि या शोनंतर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

इतक्या लहान वयात तिचे टॅलेंट बघून बडे बडे कलाकारदेखील थक्क व्हायचे. बालपणीच आपल्या अभिनय कौशल्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी सलोनी अचानक पडद्यापासून दूर गेली.

चिमुलकली सलोनी आता १८ वर्षांची झाली आहे. इ्न्स्टाग्रामवर सलोनीचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण आहे.

ती आपला बराच वेळ मित्रमैत्रिणींसह घालवते. तिचे सध्या फोटोत तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळेल.यात तिच्या लुकमध्येही फारच बदल दिसत आहे.

लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे सलोनी लक्ष वेधून घेतेय. सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते.

सध्याच्या फोटोंमध्ये सलमोनीचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळतोय.

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत सलोनी अभिनेत्रींप्रमाणे जास्त सजग झाली आहे.

सलोनीचेही सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.

हे फोटो तिच्या फॅन्सना देखील चांगले आवडले आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत आहे.

सोशल मीडियावर सलोनीदेखील प्रचंड लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.