मृणाल दुसानीसचा नवा लूक तुम्ही पाहिला का? पाहा नव्या लूकमधील फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 06:50 PM2021-03-05T18:50:21+5:302021-03-05T18:56:00+5:30

मृणाल दुसानीस सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तिने काही दिवसांपूर्वी तिच्या नव्या लूकचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती

मृणालच्या नवऱ्याचे नाव नीरज असून 25 फेब्रुवारी 2016 ला दोघांनी लग्न केले. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरज मोरेसह अरेंज मॅरेज पद्धतीने मृणाल लग्नबंधनात अडकली.

मराठी इंडस्ट्रीत सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री अशी मृणालची ओळख निर्माण झाली आहे. तिने तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे.

मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.

अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरज मोरेसह अरेंज मॅरेज पद्धतीने मृणाल लग्नबंधनात अडकली. नीरज अमेरिकेतच राहात असून मृणाल काही महिने भारतात तर काही महिने अमेरिकेत राहाते.

मृणाल पतीसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते