तारक मेहता का उल्टा चष्मा मधील कलाकारांना एका एपिसोडसाठी मिळते बक्कळ मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:47 PM2021-04-14T16:47:36+5:302021-04-14T16:56:16+5:30

दिलीप जोशी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहे. त्याला एका भागाचे दीड लाख रुपये मिळतात.

जेठालालच्या वडिलांच्या भूमिकेत आपल्याला अमित भटला पाहायला मिळत आहे. अमित एका भागासाठी 70 ते 80 हजार रुपये घेतो.

तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढाला एका भागासाठी एक लाख रुपये मिळतात.

गोकुळधाम सोसायटीतील एकमेव सेक्रेटरी म्हणजेच आत्माराम तुकाराम भिडेच्या भूमिकेत आपल्याला मंदार चांदवडकरला एका भागासाठी सुमारे 80 हजार रुपये मिळतात.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेत बबिताच्या भूमिकेत असलेल्या मुनमुन दत्ताला 35 ते 50 हजारांच्या दरम्यान मानधन मिळते.