'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बुलबुल आहे मराठी अभिनेत्री, आहे खूप लोकप्रिय

By तेजल गावडे | Published: October 22, 2020 03:31 PM2020-10-22T15:31:12+5:302020-10-22T15:44:04+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बुलबुल खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कित्येक कलाकार १२ वर्षांपासून जोडले गेले आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे खुशबू तावडे. खुशबू तावडेला लोक तारक मेहताची बुलबुल या नावाने ओळखतात. (PHOTOS: INSTAGRAM)

खुशबू तावडे मराठमोळी अभिनेत्री आहे. ती मुळची मुंबईची असून तिचा जन्म डोंबिवलीत झाला आहे आणि लहानाची मोठीही ती तिथेच झाली आहे. (PHOTOS: INSTAGRAM)

खुशबू तावडेने तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बुलबुल नामक भूमिका साकारली आहे. बुलबुल आणि पोपटलालची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली आहे. (PHOTOS: INSTAGRAM)

खुशबूने बऱ्याच मराठी मालिका व चित्रपटात काम केले आहे. (PHOTOS: INSTAGRAM)

खुशबूला वाचनाची आवड असून बऱ्याचदा ती पुस्तक वाचतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTOS: INSTAGRAM)

खुशबू तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेसोबत २००८ सालापासून जोडली गेली आहे. (PHOTOS: INSTAGRAM)

खुशबू तावडेच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर तिने मराठी अभिनेता संग्राम साळवीसोबत २०१८ साली लग्न केले आहे. (PHOTOS: INSTAGRAM)

खुशबूची बहिण तितिक्षा तावडेदेखील अभिनेत्री असून ती मराठी मालिकेत काम करते. (PHOTOS: INSTAGRAM)

(PHOTOS: INSTAGRAM)