अपूर्वा नेमळेकर सांगतेय, या व्यक्तीवर करते मी जीवापाड प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 07:45 PM2021-04-05T19:45:00+5:302021-04-05T19:45:02+5:30

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडद्यावरील अपूर्वाच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

तिच्या प्रत्येक भूमिकेचे सर्वत्र कौतुक झालं. अभिनयाप्रमाणेच सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अपूर्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

अपूर्वा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि मालिकांविषयी तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

नुकताच अपूर्वाने एक फोटो शेअर केला असून ती या फोटोतील व्यक्तीवर जीवापाड प्रेम करते असे तिने सांगितले आहे.

ही व्यक्ती दुसरी कोणी नाही तर तिची आई आहे. तिने आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अपूर्वाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

मरणयातना सहन करून जी आपली जीवनयात्रा सुरू करुन देते ती.... "आई", असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता या भूमिकेमुळे अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

शेवंता या भूमिकेनंतर 'तुझ माझं जमतंय' या सिरीअलमधून पम्मीच्या रुपात आपल्याला दिसली होती.

अपूर्वाच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.