लाइव न्यूज़
 • 02:18 AM

  नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

 • 11:10 PM

  भंडारा : भरधाव मेटॅडोरच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार. तुमसर तालुक्याच्या मांडळ येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजताची घटना. अंकुश रामा चौधरी (३५) रा. मांडळ असे मृताचे नाव. नातेवाईकाचा लग्नसोहळा आटोपून गावी परतताना अपघात.

 • 10:10 PM

  Corona In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६११ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू

 • 09:56 PM

  अकोला : अकोला, अकोट व मूर्तिजापूर शहरांमध्ये लॉकडाउन ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे.

 • 08:56 PM

  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळले 99 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; तिघांचा मृत्यू

 • 08:53 PM

  इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार, तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार

 • 08:50 PM

  करनाल: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केल्यानंतर कामगार हक्क कार्यकर्त्या नोदीप कौर यांची तुरूंगातून सुटका

 • 08:25 PM

  अकोला: अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, २६८ पॉझिटिव्ह.

 • 08:25 PM

  मुंबई: उपाहारगृह वाचविण्यासाठी साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचे फिल्मसिटीत सत्याग्रह आंदोलन; खासदार गोपाळ शेट्टींची आंदोलनास्थळी भेट

 • 06:50 PM

  गडचिरोली : एका मृत्यूसह 24 कोरोनारुग्णांची नोंद, तीन महिन्यानंतर सर्वाधिक रुग्ण

 • 06:49 PM

  यवतमाळमध्ये शनिवार सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी

 • 05:48 PM

  नवी दिल्ली - आसामच्या १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान, पहिल्या टप्प्याचं २७ मार्चला मतदान, दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान, तिसऱ्या टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान

 • 05:45 PM

  तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार, ६ एप्रिल रोजी मतदान आणि २ मे रोजी जाहीर होणार निकाल

 • 05:33 PM

  पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यात मतदान होणार, पहिला टप्पा २७ मार्च, दुसरा १ एप्रिल, तिसरा ६ एप्रिल, चौथा १० एप्रिल, पाचवा १७ एप्रिल, सहावा टप्पा २२ एप्रिल, सातवा २६ एप्रिल, तर आठव्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान

 • 05:28 PM

  पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार, सहा एप्रिल रोजी होणार मतदान, २ मे रोजी निकाल

All post in लाइव न्यूज़