"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 06:00 AM2020-09-27T06:00:00+5:302020-09-27T06:00:00+5:30

'युवा डान्सिंग क्वीन' हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय . अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. याच दरम्यान तिने दमादार परफॉर्मन्स सादर केला नेहमीप्रमाणे चाहत्यांना तिचा अंदाज खूपचं आवडला. यावेळी तिने काही खास फोटोशूटही केले आहे.

सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे उत्कृष्ट परीक्षण आणि अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे शोने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे.

नेहमीप्रमाणे सोनालीचा अंदाज रसिकांना अधिक भावतो आहे.

'नटरंग' या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते.

त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

नुकताच सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. यांतून नाशीशक्तीचा संदेश दिल्याचे पाहायला मिळते आहे.

व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही.

सोनालीच्या या व्हिडीओ आणि फोटोला सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे.

फॅन्सकडून या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

सोनालीच्या या लूकवरही चाहत्यांची नजर हटत नसून फिदा होत असल्याचे पाहायला मिळतंय.