सोनाली कुलकर्णीच्या हटके योगा पोज पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है !

Published: May 11, 2021 08:18 PM2021-05-11T20:18:37+5:302021-05-11T20:24:04+5:30

सुंदर आणि फीट दिसणं यासाठी सोनाली कुलकर्णी खूप मेहनत घेते . ती दिवसाची सुरुवात योगा ने करते . स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सूर्य नमस्कार, वेगवेगळ्या प्रकारची आसनं करते.

सध्याच्या काळात फिट राहणं हे फारच गरजेचं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरणा देत असते.

सोनालीने केलेली काही ही आसनं पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले होते.

विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.

नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे हे योगामुळे शक्य होतं.

रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो.

योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत.

योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो."

सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून पाहून तुम्हालाही योगा करण्यासाठी प्रेरणा नक्कीच मिळाली असेल.

नित्यनियमाने योगा करत ती स्वतःला अशा प्रकारे फिट ठेवते.

नेहमीच ती वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउट करताना दिसते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!