'अब हम 7 मे' म्हणत अप्सरा सोनाली कुलकर्णीने केली लग्नाची घोषणा, पाहा तिच्या लग्नाचे अविस्मरणीय क्षण

Published: May 18, 2021 08:12 PM2021-05-18T20:12:13+5:302021-05-18T20:36:03+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्नीनगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या लग्नाची घोषणा केली. सोनालीचा आज 33वा वाढदिवस आहे. (Photo Instagram)

तिचे लग्न ७ मे रोजी दुबईत पार पडले. यावेळी तिच्या घरातल्यांनी भारतातून आणि कुणालच्या घरातले लंडनमधून ऑनलाईन लग्नाला उपस्थिती लावली. (Photo Instagram)

सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर कुणाल बेनोडेकरसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, अब से हम ‘7’ ‘मे’ . आम्ही जूनमध्ये लंडनला लग्न करणार होतो. (Photo Instagram)

लंडनमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख पुढे ढकलावी लागली, मग व्हेन्यूच्या उपलब्धते अनुसार जुलैमधली तारीख ठरली.कुणाल बरोबर बसून लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शूटिंग संपवून दुबईला आले, आणि भारतात कोरोनाची दुसरी लाट आली.(Photo Instagram)

कुणाल हा दुबईत एका मोठ्या हुद्दयावर वित्तीय अधिकारी म्हणून काम करतो. कुणालचे कुटुंब लंडनमध्ये राहतात तर सोनलीचे कुटुंब भारतात असतात. (Photo Instagram)

त्यातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. (Photo Instagram)

यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला 2 यांसारखे अनेक चित्रपट केले.(Photo Instagram)

सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली. .(Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!