कुणी म्हणतंय ऋतुराणी तर कुणी परमसुंदरी..!, सायली संजीवच्या हिरव्या साडीतील फोटोंवर फिदा झाले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:48 PM2021-10-20T15:48:12+5:302021-10-20T16:04:27+5:30

बऱ्याच दिवसांपासून सायली संजीवचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या खूप चर्चेत येत आहे. त्याला कारणही तसेच आहे.

गेल्या काही महिनांपासून तिचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे.

सायली (Sayali Sanjeev) च्या इंस्टाग्रामवरील फोटोवर ऋतुराजने कमेंट केल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

तेव्हापासून सायलीच्या कोणत्याही पोस्टवर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शी संबधीत कमेंट केली जात आहे.

दरम्यान सायली संजीवने इंस्टाग्रामवर नुकतेच हिरव्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

सायली संजीवच्या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करताना दिसत आहे.

कुणी सायली संजीवच्या फोटोवर ऋतुराणी, तर कुणी परमसुंदरी आणि गायकवाड वहिनी अशी कमेंट्स करताना दिसते आहे.