मराठी अभिनेत्रीने फोटोशूटसाठी लढवली अनोखी शक्कल, पाहणारे पाहतच राहिले

Published: June 15, 2021 05:39 PM2021-06-15T17:39:26+5:302021-06-15T17:46:31+5:30

आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री पूजा सावंत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.

यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर थेट बॉलिवूडमध्येही एंट्री केली.

'जंगली' या हिंदी सिनेमातून पूजा रसिकांच्या भेटीला आली होती.

अभिनेता विद्युत जामवालसोबत ती 'जंगली' सिनेमात झळकली आहे.

पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते.

सोशल मीडियावर सध्या तिच्या फोटोने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

तलावात झोपून तिने फोटोशूट केल्याचे पाहायला मिळतंय.

पूजा सावंतच्या या आगळ्या वेगळ्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!